मुंबई : ई-पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या नोटाबंदीदरम्यान गॅसच्या ऑनलाईन बुकिंगवर सूट दिली होती. असे करणा-यांना गॅस सिलेंडरवर ५ रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेवेचा लाभ तेच ग्राहक घेऊ शकतात जे ऑनलाईन गॅस बुकिंग करतील आणि त्याचं पेमेंटही ऑनलाईन करतील. खास गोष्ट ही की, हा डिस्काऊंट केवळ सब्सिडी असलेल्या सिलेंडरसोबतच सब्सिडी नसलेल्या सिलेंडरवर सुद्धा मिळेल. १ नोव्हेंबरपासून सब्सिडी असलेल्या गॅस सिलेंडरची किंमत ९३ रूपये झाली आहे. म्हणजे सिलेंडर आता ७४२ रूपयांना मिळतो आहे. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्यास तुम्हाला ५ रूपयांची सूट मिळू शकते.


बिलात दिसतील डिस्काऊंट डिटेल्स


तेल मंत्रालयाने याबाबत सांगितले होते की, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमने आपल्या ग्राहकांना ही सूट दिली आहे. ते ऑनलाईन बुकिंग करताना नेट बॅंकिंग आणि क्रेडिट कार्डसारख्या पर्यायांद्वारे पेमेंट करू शकतात. मिळालेल्या डिस्काऊंटची रक्कम बिलात दिली जाईल. 


अ‍ॅपद्वारेही होऊ शकते बुकिंग


अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल फोनवर गुगल प्ले किंवा प्ले स्टोरच्या माध्यमातून इंण्डेन, एचपी आणि भारत गॅस या एलपीजी कंपन्यांची अ‍ॅप डाऊनलोड करता येऊ शकते. यासाठी त्या तुम्ही त्या गॅस कंपनीचे ग्राहक असणे गरजेचे आहे. 


अ‍ॅपवर मिळणार या सेवा


- सिलेंडर बुकिंग हिस्ट्री
- मेकॅनिक सर्व्हिस
- गॅस सिलेंडर डिलिव्हरी टाईम
- लोकेट डिस्ट्रीब्यूटर्स
- चेंज डिस्ट्रिब्यूटर्स