5G इंटरनेट सेवा या महिन्यापासून सुरु होणार, लिलावाला मंजुरी; इतक्या स्पीडचा दावा
5G Internet Service: अनेक दिवसांची 5Gबाबतची प्रतिक्षा संपली आहे. देशात नवी क्रांती होत आहे. आता 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे.
नवी दिल्ली : 5G Internet Service: अनेक दिवसांची 5Gबाबतची प्रतिक्षा संपली आहे. देशात नवी क्रांती होत आहे. आता 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे. या महिन्यापासून 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे. लिलावावला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता 5Gचा आनंद लुटता येणार आहे. इंटरनेट स्पीडही वाढणार आहे.
8 जुलैपासून 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज करता येणार आहे. आणि 26 जुलैपासून लिलाव सुरु होईल. ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी केली.
सरकारने दिली ही माहिती
अश्विनी वैष्णव म्हणाले, “दूरसंचार सेवा प्रदात्यांसाठी व्यवसाय करण्याची किंमत कमी करण्यासाठी मंत्रिमंडळाने IMT/5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. 5G सेवा लवकरच सुरु होणार आहे. 72 GHz वरील स्पेक्ट्रम, 4G पेक्षा सुमारे 10 पट वेगवान, 20 वर्षांच्या कालावधीसाठी लिलाव केला जाईल.
मशिन-टू-मशीन कम्युनिकेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), आरोग्य सेवा, कृषी, ऊर्जा क्षेत्रात वापरल्या जाणार्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या नवीन युगातील अॅप्लिकेशन्समध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने 'खासगी प्रवेश नेटवर्क'ला मान्यता दिली आहे.
सरकारने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पेक्ट्रम लिलावासाठी दूरसंचार विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, ज्याअंतर्गत सार्वजनिक आणि उद्योगांना 5G सेवा प्रदान करण्यासाठी यशस्वी बोलीलावणाऱ्यांना स्पेक्ट्रम प्रदान केले जाईल किंवा वाटप केले जाईल.
सरकार जुलै अखेरीस 20 वर्षांच्या मुदतीसाठी एकूण 72097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करेल. याशिवाय विविध कमी, मध्यम आणि उच्च वारंवारता बँडसाठी स्पेक्ट्रम लिलाव देखील होणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांना चालना देत, मंत्रिमंडळाने स्पेक्ट्रम लिलावाशी संबंधित अनेक विकास पर्यायांची घोषणा केली आहे. ज्यामुळे व्यवसाय करण्यासाठी चालना मिळेल.