5G Network मुळे मिळतील `हे` 5 फायदे; पाहा डिटेल्स
5G Launch in India : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनी देशात 5G सेवा सुरू केली आहे. यासह भारत 4G वरून 5G वर श्रेणीसुधारित होत आहे. 5G सेवा सुरू झाल्यानंतर पाच फायदे मिळणार आहेत. नेमकं कोणते फायदे मिळणार आहेत याबाबत सविस्तर जाणून घ्या...
5G Launch in India : आज देशात बहुप्रतिक्षित अशा 5G नेटवर्कला (5G Internet Service) सुरुवात झाली आहे. भारतात सुरु असलेल्या डिजिटल इंडिया (Digital Inadi) चळवळीलाही या 5G इंटरनेट सेवेमुळे (5G Internet Benefits) फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण पार पडलं. दरम्यान 5G सेवा सुरू झाल्यानंतर पाच फायदे मिळणार आहेत. नेमकं कोणते फायदे मिळणार आहेत याबाबत सविस्तर जाणून घ्या...
- 5G सेवा सुरू झाल्यानंतर तुम्हाला इंटरनेट स्पीड मिळेल. हायस्पीड इंटरनेटमुळे लोक 5G सेवेची सर्वाधिक वाट पाहत होते आणि आता लोक या सेवेचा लाभ काही वेळात घेऊ शकणार आहेत.
- 5G सेवा सुरू झाल्यानंतर कॉल ड्रॉपपासून मुक्ती मिळणार आहे. 4G सेवेमध्ये कॉल ड्रॉपची समस्या सामान्य झाली होती. गेल्या दोन-तीन वर्षांत लोकांना या समस्येमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता 5G सेवेमुळे आता कॉल ड्रॉप होणार नाही.
- कॉल ड्रॉप ही एकच समस्या होती. यासोबतच क्लिअर ऑडिओ नसल्यामुळे कॉलिंग डिस्टर्ब होतात. 5G सेवेनंतर तुम्हाला कॉलिंग दरम्यान क्रिस्टल क्लिअर ऑडिओसह शक्य होईल.
- हाय स्पीड इंटरनेट सोबतच आता ग्राहकांना 5G सेवा लाँच झाल्यानंतर सुपर फास्ट डाउनलोडिंग स्पीड (internet speed) देखील मिळेल. याच दरम्यान दर्जेदार चित्रपट आणि व्हिडीओ (video) डाउनलोड केले जातील.
- व्हिडिओ कॉलमध्ये एक समस्या असायची की, इंटरनेट कनेक्टिव्हिटी कितीही चांगली असली तरीही व्हिडिओ नेहमीच स्लो असायचा. पण आता 5G सेवेमुळे व्हिडिओ कॉलिंग अधिक चांगले होईल आणि व्हिडिओची गुणवत्ता देखील खूप चांगली असेल.
वाचा : या पुरुषांचे Love Life दीर्घकाळ टिकते, स्त्रियाही खूश राहतात
5G ची किंमत काय असेल?
रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) या कंपन्या 4G च्या किंमतीमध्ये 5G इंटरनेट सेवा देण्याची शक्यता आहे. 5G इंटरनेट सेवा 4G पेक्षा 20 टक्क्यांपर्यंत महाग असू शकते. त्यामुळे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रम लिलावात मोठी रक्कम गुंतवल्याचं म्हटलं जातं आहे. आता भारतात 5G च्या किंमती काय असतील हे पाहावे लागेल.