5G Technology | आयुष्य होणार सुपरफास्ट; अल्ट्रा व्हिडिओ कॉलिंगही शक्य
दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते भारतात पुढील 3 महिन्यात 5G तंत्रज्ञान येऊ शकते
5G technology latest news : 5G तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक गतिमान होणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते भारतात पुढील 3 महिन्यात 5G तंत्रज्ञान येऊ शकते. सुरूवातीच्या काही दिवसात ही सेवा मर्यादित ठिकाणी सुरू असेल. कारण 5G तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या ऑप्टीकल फायबरची पायाभूत रचना अजूनही पूर्णतः तयार नाही. या क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी अद्यापही खूप काम करण्याची गरज आहे.
5G सेवांच्या नेटवर्कबाबतीत लवकर निर्णय घेण्याची गरज
नोकिया इंडियाचे मार्केटिंग आणि कॉर्पोरेट अफेअर्सचे प्रमुख अमित मारवाह यांनी म्हटले की, 'भारताला 5G सेवांच्या नेटवर्क बाबतीत ठोस निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर पुढील पिढी या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकणार नाहीत. 5G तंत्रज्ञान सध्या काळाची गरज आहे'.
Ultra HD video calling
5G नेटवर्कवरून अल्ट्रा एचडी क्वॉलिटीचे व्हिडिओ कॉलिंगसुद्धा केली जाऊ शकते. सोबतच स्मार्ट डिवाइसेसमध्ये मजबूत कनेक्टिव्हिटी मिळेल. ज्याने आपले आयुष्य अतिशय वेगवान होईल.
स्वदेशी उपकरणांचा वापर
दूरसंचार निर्यात आणि संवर्धन परिषदचे अध्यक्ष संदीप अग्रवालने या मुद्द्याला महत्व दिले की, 5G मध्ये स्वदेशी उपकरणांचा वापर व्हायला हवा. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने यासाठी लागणारे उपकरणे भारतातील असणे अपेक्षित आहे.
Non-standalone 5G
या तंत्रज्ञानाला बेसिक 5G नेटवर्क बॅंड म्हटले जाते. सुरूवातीला कोणत्याही परिसरातील नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाइडर्स याच बॅंडच्या आधारे 5G नेटवर्क उपलब्ध करून देत असत. यात 4G LTE सेवेच्या पायाभूत सुविधांवरच 5G नेटवर्क डिप्लॉय केले जाते. कोणत्याही परिसरात नेटवर्क टेस्टिंगसाठी दूरसंचार कंपन्या या स्पेक्ट्रमचा वापर करतात.