मुंबई : भारतात लवकरच 5G ची सेवा सुरु होणार आहे. याची चाचणी भारतात लवकरच सुरू होणार आहे. न्यूज एजन्सी IANS च्या मते, दूरसंचार मंत्रालयाच्या पॅनेलने चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. जून महिन्यात त्याची चाचणी सुरू होईल. अहवालानुसार, आधी त्याची तीन महिन्यात चाचणी होईल. पुढील दोन आठवड्यांमध्ये, सॅमसंग, नोकिया आणि एरिक्सन यांना परवाने दिले जाऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ एअरटेल, नोकिया आणि एरिक्सन वोडाफोन-आयडियासह सॅमसंग आणि रिलायन्स देखील या प्रकल्पाला सहकार्य करतील. त्यासाठी पहिल्या 5G स्पेक्ट्रमची वाटणी केली जाईल. माहितीनुसार, दिल्लीच्या कनॉट प्लेसमधून चाचणी सुरू केली जाईल. दूरसंचार मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की नंतर या कालावधीचा वाढवण्याचा विचार केला जाईल.



सध्या, चीनची कंपनी Huawei बद्दल परिस्थिती स्पष्ट नाही. अमेरिका पुन्हा-पुन्हा भारतसह अन्य देशांना Huawei ला बाहेर ठेवण्याची मागणी करत आहे. ट्रायल पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये स्पेक्ट्रमची विक्री होईल.