5G vs 4G Comparison: 2G, 3G आणि 4G नंतर देशात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे. देशाच्या विविध भागात 5G सेवा चाचणी सुरु आहे.  केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला हिरवा कंदील दाखवला आहे. लिलाव 26 जुलैपासून सुरू झाला आहे.   या अंतर्गत दूरसंचार कंपन्यांना वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर 20 वर्षांसाठी लीज मिळेल. यामध्ये रिलायन्स, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्कचा समावेश आहे. यासाठी एकूण 72 गिगाहर्ट्झ (GHz) 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी उपलब्ध असेल. लिलाव 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, 3300 MHz (मध्यम), 26 GHz (उच्च) फ्रिक्वेन्सी बँडमध्ये होणार आहे. याशिवाय कंपन्यांना स्पेक्ट्रमच्या किंमती 20 समान EMI मध्ये देण्याची सुविधा दिली जाईल. त्याचबरोबर खासगी कॅप्टिव्ह नेटवर्क उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे. पण 5G आल्यानंतर तुमचे इंटरनेट किती फास्ट होईल, डाउनलोड-अपलोड स्पीडमध्ये किती फरक पडेल? जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5G सेवा कधी मिळणार?


5G स्पेक्ट्रमच्या लिलावात, कंपन्यांनी 21800 कोटी रुपयांचे अर्नेस्ट मनी डिपॉजिट केले आहेत. या दरम्यान केवळ 72 GHz स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. 5G हे सर्वात आधुनिक पातळीचे नेटवर्क आहे, ज्या अंतर्गत इंटरनेटचा वेग सर्वात वेगवान असेल. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात देशात 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.


5G मुळे काय फरक पडेल?


5G मधील इंटरनेट डाउनलोड गती 150 मेगाबाइट्स प्रति सेकंदापर्यंत मर्यादित आहे. 5G मध्ये, तुम्हाला प्रति सेकंद 10GB पर्यंत दिले जाऊ शकते. या मदतीने युजर्स हेवी फाइल्स डाऊनलोड करू शकतील, अपलोडिंगचा वेगही 1GB प्रति सेकंद इतका असेल. त्या तुलनेत, 4G नेटवर्कमध्ये फक्त 50 मेगाबाइट्स प्रति सेकंदापर्यंत आहे. 


डेटा प्लान महाग होण्याची शक्यता?


बरेच युजर्स त्यांच्या नेटवर्क आणि बजेटनुसार इंटरनेट योजना निवडतात.  सध्या देशात स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू असून, या लिलावात अनेक दूरसंचार कंपन्या सहभागी आहेत. पण नवीन तंत्रज्ञानाच्या किमतीमुळे 5G सेवेची किंमत 4G पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.


इतर देशांमध्ये 5G सेवेसाठी किती पैसे आकारतात


5G सेवा अनेक देशांमध्ये आधीच उपलब्ध आहे. अमेरिकेत 4G अमर्यादित सेवा घेण्यासाठी सुमारे 5 हजार रुपये खर्च करावे लागले, तर 5G मध्ये तुम्हाला सुमारे 6500 रुपये द्यावे लागतील. 5G सेवा 4G पेक्षा 10 ते 30% जास्त महाग आहेत.


5G सेवा कधी सुरू होणार?


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 5G सेवा सुरू होऊ शकते. चाचणीसाठी, सप्टेंबरपासूनच 12 शहरांमध्ये 5G सेवा सुरू होईल. तथापि, संपूर्ण भारतात पोहोचण्यासाठी 2023 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत लागू शकेल.