६४ हजारांचा आयफोन एक्स परवडणाऱ्या किंमतीत, ही आहे अट
या फोनची किंमत तुमच्यासाठी केवळ २६ हजार ७०० रुपये असणार आहे.
मुंबई : भरमसाठ किंमत असली तरीही आयफोनची नवी सिरीज घेण्यासाठी चाहते मागेपुढे पाहत नाहीत. आयफोन एक्स भारतामध्ये येण्याआधीच त्याबद्दल चर्चा रंगू लागल्या होत्या तसेच प्रीबुकींगही झाली होती.
आताही केवळ प्रीबुकींग केलेल्यांनाच आयफोन एक्स उपलब्ध होत आहे.
भारतात आयफोन एक्स ६४ जीबी व्हेरिअंटची किंमत ६४ हजार रूपयांत तर १२८ जीबी व्हेरिअंटची किंमत १ लाख २ हजार रुपयांना उपलब्ध आहे.
पण हा फोन तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत तुमच्यासाठी केवळ २६ हजार ७०० रुपये असणार आहे.
जिओ कंपनीने ही संधी तुमच्यासाठी आणली आहे. जिओ कंपनी तुम्हाला साधारण ७० टक्के बायबॅक करणार आहे. म्हणजे तुम्ही वर्षभर फोन वापरुन जिओ कंपनीला परत केल्यावर कंपनीतर्फे तुम्हाला ७० टक्के बायबॅक मिळणार आहे.
पण जिओ कंपनीने यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
१) एका वर्षाच्या आत फोन परत करावा लागेल.
२) दर महिन्याला ७९९ रुपयांचे रिचार्ज करावे किंवा एकाचवेळी ९,९९९ चा वर्षाचा रिचार्ज लागेल. (९० जीबी ४ जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग)
३)वर्षभर फोन परत केल्यावर ७० टक्के रक्कम परत करायची की त्याबदली दुसरा स्मार्टफोन द्यायचा किंवा व्हाऊचर द्यायचे हे ठरविण्याचे अधिकार कंपनीला आहेत.