PM मोदींची मोठी घोषणा! भारतात लवकरच 6G सेवा सुरु करणार; जाणून घ्या टाइमलाइन
देशभरात ऑक्टोबरपासून 5जी (5G) सेवा सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नव्या नेटवर्कची घोषणा केली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत देशात
6G Network : देशभरात ऑक्टोबरपासून 5जी (5G) सेवा सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नव्या नेटवर्कची घोषणा केली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत देशात 6G लाँच करण्याची तयारीत आहेत.
‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ (Smart India Hackathon 2022) या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 पर्यंत भारतात 6 जी (6G) सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 5जी सेवा देशभरात सगळीकडे पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन 2022’मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली.
या तारखेपासून 5G सेवा सुरू
भारतात 5G सेवा सुरू होण्याची तारीख जाहीर झाली आहे. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरच 5G सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. भारतात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू होईल. ही प्रत्येक भारतीयासाठी मोठी बातमी आहे. कारण 5G सेवा सुरू झाल्यानंतर अनेक फायदे मिळणार आहेत. प्रक्षेपणानंतर, ते इतर शहरे आणि शहरांमध्ये विस्तारित केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन वर्षांत या सेवा देशाच्या प्रत्येक भागात पोहोचतील.
जगभरात संशोधन सुरु
सध्या जगात 6G तंत्रज्ञानावर भरपूर संशोधन सुरु आहे. जागतिक स्तरावर नोकिया, सॅमसंग इत्यादींसह अनेक कंपन्या 6G सेवेसाठी संशोधन करत आहेत. या सुपरफास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी भारतात सुरू असलेली तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संबोधनातून दिसून येते.