Kids in car boot: देशात रस्ते अपघातांचं प्रमाण पाहता वाहतुकीचे नियम कठोर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती केलं जात आहे. असं असलं तरी अनेकदा निष्काळजीपणामुळे अपघातात मृत्यू होत असतात. रस्त्यावर वाहन चालवतानाखूप काळजी घ्यावी लागते. मात्र, कधी कधी आपण नकळत केलेली चूक महागात पडते. नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती कारच्या डिक्कीमध्ये 3 मुलांना घेऊन जात आहे. कोणीतरी या घटनेचे रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना हैदराबादची आहे. व्हिडिओ ट्विट करत एका व्यक्तीने वाहतूक पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली. व्हिडीओमध्ये ह्युंदाई ग्रँड i10 कार रस्त्यावरून जाताना दिसत आहे. कारची डिक्की उघडी होती आणि त्यात 3 मुलं बसलेली दिसत आहे. याशिवाय कारमध्ये आणखी पाच जण बसलेले आहेत.



हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनीही व्हिडिओवर तात्काळ कारवाई केली आणि चालकाविरुद्ध ई-चलन जारी केले. व्हिडिओ पाहून अनेक ट्विटर युजर्सनी कमेंट्समध्ये आपला संताप व्यक्त केला. एका युजरने तर अशा पालकांना अटक करण्याचा सल्ला दिला. अशी चूक केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नाही, तर तुमच्या मुलांसाठी किंवा गाडीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे अशी चूक कधीही करू नये.