Aadhaar Mobile Number Verify : केंद्र सरकारने आधार कार्ड सगळ्यांनाच बंधनकारक केले आहे. तसेच आधारला मोबाईल क्रमांक लिंक करणेही गरजेचे झाले आहे. जर तुमचा मोबाईल आधारला लिंक आहे की नाही, याची पडताळणीही करता येते. युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) मंगळवारी त्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर एक नवीन सुविधा सुरु केली, ज्याच्या मदतीने लोक आधारशी लिंक केलेले मोबाइल फोन आणि ई-मेल आयडी याची माहिती सहज घेऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही आधारला पॅन लिंक केले असेल. नसेल तर 30 जून ही शेवटची तारीख आहे. समजा ते पॅन आधारला लिंक केले नसेल तर त्यानंतर तुम्हाला दंड स्वरुपात 1000 रुपये मोजावे लागतील. दरम्यान, काही बाबतीत असे दिसून आले की, लोकांना त्यांचा कोणता मोबाईल क्रमांक आधारशी जोडला गेला आहे हे देखील माहित नाही. हे लक्षात घेऊन UIDAI नवीन सुविधा सुरु केली आहे. याच्यामाध्यमातून तुम्ही आधार - मोबाईल लिंकची पडताळणी करु शकता.


UIDAI ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,  यामुळे लोकांना काळजी वाटायची की आधार OTP दुसऱ्या मोबाईल नंबरवर गेला तर त्यांना कळणार नाही. आता या सुविधेमुळे लोक त्यांच्या आधारशी कोणता मोबाईल किंवा ई-मेल आयडी लिंक आहे हे सहज शोधू शकतात किंवा माहिती जाणून घेऊ शकतात.


तसेच ही सुविधा अधिकृत संकेतस्थळ किंवा m-Aadhaar अॅपद्वारे 'ईमेल/मोबाइल नंबर' पडताळणी करु शकतात. मोबाईल नंबर लिंक नसला तरीही ही सुविधा लोकांना मोबाईलद्वारे मिळू शकते. मोबाईल नंबर अपडेट करण्याबद्दल माहिती देत आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधारीशी लिंक करु शकता.


समजा जर मोबाईल नंबर आधीच लिंक केला असेल तर रहिवाशांना स्क्रीनवर एक मेसेज प्रदर्शित होईल. त्या संदेशात असे लिहिलेले असेल की तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर आमच्या रेकॉर्डवरुन आधीच लिंक केला गेला आहे. आधार क्रमांक घेताना त्याने दिलेला मोबाईल क्रमांक कोणाला आठवत नसेल, तर अशावेळी तो 'माय आधार' पोर्टल किंवा mAadhaar अॅपवर नवीन सुविधेअंतर्गत मोबाईलचे शेवटचे तीन अंक तपासू शकतो. UIDAI, ईमेल आणि मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्यासाठी जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.


 मोबाईल नंबर आधारशी कसा लिंक करायचा?


तुम्हाला भारतीय पोस्टल सर्व्हिसच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल याची माहिती भरावी लागेल. आता ड्रॉप-डाऊन मेनूमध्ये PPB-आधार सेवा निवडावी लागेल. यानंतर, आधार लिंकिंग/अपडेट करण्यासाठी  UIDAI-Mobile/Email to Aadhaar linking/update वर क्लिक करा आणि नंतर तपशील भरा आणि त्याप्रमाणे कृती करा.