Discount on Air Conditioner: फेब्रुवारी महिना संपताच उन्हाळ्याच्या चाहूल लागते. बरं उन्हाळ्याची (Summer Season) चाहूल लागल्यानंतर सर्वात आधी तयारी सुरु होते पुढील चार महिने उष्णतेचा तोंड देण्याची तयारी. यात अगदी घरामधील पंख्यांपासून ते कूलरपर्यंत एसी (AC) खरेदीचाही ट्रेण्ड वाढल्याचं चित्र दिसून येतं. उन्हाळा सुरु झाल्यानंतर दरवर्षी आवर्जून किंमत वाढणारी गोष्ट म्हणजे एअर कंडिशनर (Air Conditioner) म्हणजेच एसी. उन्हाळ्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक बाजारापेठेत सर्वात जास्त स्प्लिट किंवा विंडो एसीची मागणी असते. मात्र मागणी वाढल्याने एसीच्या किंमतीही अधिक असतात. मात्र सध्या कडाक्याची थंडी पडलेली असताना तुम्ही एसी विकत घेण्याचा विचार केला तर त्याचा बराच आर्थिक फायदा होऊ शकतो. 


हजारो रुपयांची बचत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळा अजून काही आठवडे दूर असतानाच अनेक वेबसाईट्सने मोठ्या प्रमाणात एसीवर सूट देण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या उन्हाळ्याआधी एसी घेण्याचा विचार करत असाल तर सध्या वेबसाईट्सवर सुरु असलेल्या एका खास ऑफरबद्दल तुम्ही जाणून घेणं खरोखरच फायद्याचं ठरु शकतं. अनेक हजार रुपयांची बचत या माध्यमातून तुम्हाला करता येईल. या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...


सर्वाधिक सूट असलेला एसी


सध्या ज्या एसीवर सर्वाधिक सूट मिळत आहे तो वर्लपूल (Whirlpool) कंपनीचा आहे. या कंपनीचा 4 इन 1 प्रकारातील दीड टनाचा कनव्हर्टेंबल एसी हा फाइव्ह स्टार रेटिंग असलेला स्पिट एसी (Whirlpool 4 in 1 Convertible Cooling 1.5 Ton 5 Star Split Inverter AC) आहे. 'फ्लिपकार्ट'वर (Flipkart AC Offer) या एसीवर घसघशीत ऑफर देण्यात आली आहे. एखाद्या मोठ्या आकाराच्या खोलीसाठी तुम्ही एसीचा विचार करत असाल तर दीड टन क्षमतेचा हा एसी एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. हा एसी अर्ध्याहून किमी किंमतीला उपलब्ध असून 'फ्लिपकार्ट'च्या माध्यमातून वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.


हे ही वाचा >> Netflix: मित्रांबरोबर Netflix Password शेअर करणं 'महागात' पडणार; कंपनीचा नवा नियम


जास्त कुलिंग होणार


या एअर कंडिशनचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा एक इनव्हर्टर एसी आहे. याची क्षमता दीड टनाची असून त्याला फाइव्ह स्टार बीईई (5 Star BEE) रेटिंग आहे. म्हणजेच वीज वाचवण्यासाठी हा सर्वोत्तम एसीपैकी एक आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. या एसीला 25 टक्के कमी वीज लागते. या एसीमध्ये ग्राहकांना ऑटो रिस्टार्टचा (Auto Restart) पर्यायही उपलब्ध आहे. यामध्ये कॉपरचा (Copper) वापर करण्यात आला असून त्यामुळेच दमदार कुलिंगमध्ये हा एसी याच दर्जाच्या इतर एसींपेक्षा अधिक सक्षम ठरतो. या एसीच्या मेन्टेन्सचा खर्चही फार कमी आहे. 


किंमत किती?


या एसीमध्ये ऑटो अॅडजेस्टिंग टेम्प्रेचरचा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजेच वारंवार एसीचं तापमान रिमोटने अॅडजेस्ट करण्याची गरज लागत नाही. एअर किंडिशनची मूळ किंमत 74 हजार 700 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा एसी 34 हजार 440 रुपयांना उपलब्ध आहे.