iPhone 14 Price Drop: मंगळवारी आयफोन 15 सीरीज लाँच होताच आयफोन 14 आणि 13च्या किंमतीत मोठी घट झाली आहे.  अॅपल कंपनीने  iPhone 14 आणि iPhone 14 Plus च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. आयफोन घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्ही स्वस्त्यात आयफोन खरेदी करु शकणार आहात. मंगळवारी आयफोनचा वंडरलस्ट इव्हेंट पार पडला. यात कंपनीने आयफोन 15 सीरीजमधील iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max हे चार स्मार्टफोन लाँच केले आहेत. आयफोन सीरीजमधील हे फोन लाँच होताच आधीच्या व्हर्जनच्या स्मार्टफोनची किंमत उतरली आहे. जाणून घेऊया iPhone 14 आणि iPhone Plus वर किती डिस्काउंट मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅपलने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 14 आणि iPhone Plus लाँच केले होते. या दोन्ही स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 79,000 आणि 89,900 इतकी होती. मात्र आता आयफोन सीरीजच्या लाँचिगनंतर अॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. जाणून घेऊया किंमत 


आयफोन 14 आता 128 जीबी व्हेरियंटची किंमत 69,900, 256 जीबी व्हेरियंट 79,900 आणि 512 जीबी व्हेरियंट 99,900 या किंमतीत उपलब्ध आहे. तर, आयफोन 14 Plusचा 128 जीबी व्हेरियंट 79,990, 256 जीबी व्हेरियंट 89,990 आणि 512 जीबी व्हेरियंट 1,09,990 मध्ये उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त युजर्स एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डचा उपयोग करुन 8 हजारापर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. 


10 हजारांनी आयफोन स्वस्त


आयफोन 14 चे 128 GB, 256 GB आणि 512 GB या तीन व्हेरियंटची किंमत 10 हजारांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तर, आयफोन 14 प्लसही 10 हजारांपर्यंत स्वस्त झाले आहेत. आयफोन 14 प्लसचे 128 GB, 256 GB आणि 512 GB तुम्ही आता स्वस्तात खरेदी करु शकतात. अॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर आयफोन 14 प्लसच्या सर्व व्हेरियंट नवीन किंमतीसह अपडेट केले आहेत. 


आयफोन 14 चे फिचर्स


iPhone 14 मध्ये Apple A15  बायोनिक चिपसेट देण्यात आली आहे. 128 GB, 256 GB आणि 512 GB हे तीन व्हिरियंट देण्यात आले आहेत. iPhoneमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रेजोल्यूशन 2532 X 1170 पिक्सल इतके आहे. त्याचबरोबर सिरेमिक शील्ड प्रोटेक्शनदेखील आहे. स्मार्टफोनमध्ये डुअल कॅमेऱ्याचे युनिट देण्यात आले असून फोनच्या मागे 12 MP चा प्रायमरी सेन्सर आणि 12 MP चा अल्ट्रा-वाइट सेंसर देण्यात आला आहे.