जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने आणली मोठी ऑफर
जेव्हापासून रिलायन्सने जिओ मार्केटमध्ये आणलं तेव्हापासून जोरदार स्पर्धा सुरु झाली. अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना धरुन ठेवण्यासाठी वेगवेगळे ऑफर आणि प्लान देऊ लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला.
मुंबई : जेव्हापासून रिलायन्सने जिओ मार्केटमध्ये आणलं तेव्हापासून जोरदार स्पर्धा सुरु झाली. अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना धरुन ठेवण्यासाठी वेगवेगळे ऑफर आणि प्लान देऊ लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला.
प्रत्येक कंपनी बाजारात रोज नवीन नवीन प्लान आणत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी नेक कंपन्या प्रयत्न करत आहेत. यातच आहे प्रीपेड ग्राहकांसाठी एअरसेलने देखील एक ऑफर आणली आहे.
20 पैसे प्रति मिनिट कॉल रेट
एअरसेलने एक वर्ष वॅलिडीटी असलेला प्लान आणला आहे. यामध्ये 104 रुपयांच्या रिचार्जवर एक वर्षासाठी 20 पैसे प्रति मिनिट कॉल रेट चार्ज लागतील. यामध्ये एसटीडी कॉल आणि लोकल कॉलचा समावेश आहे. याशिवाय आणखी 2 प्लान कंपनीने आणले आहेत.
2 नवीन प्लान लॉन्च
88 रुपयांच्या रिचार्जवर 1GB प्रतिदिन डेटा आणि अनलिमिटेड एसटीडी आणि लोकल कॉल मिळणार आहे. ही ऑफऱ 7 दिवसांसाठी आहे. दुसरा प्लान 199 रुपयांचा आहे ज्यामध्ये 28 दिवस दररोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स करता येणार आहे.