मुंबई : पदार्पणातच बाजारपेठेतील स्पर्धक कंपन्यांचा अवकाश व्यापून घेण्यात रिलायन्स जिओ यशस्वी ठरली. भारतातील टेलिकॉम क्षेत्रात एकच खळबळ उडाली. रिलायन्सचा वारू रोखण्यासाठी जवळपास सर्वच कंपन्यांनी कंबर कसली आहे. म्हणूनच या कंपन्यांनी ग्राहकांवर विविध ऑफर्सची बरसात सुरू केली आहे. आयडीया, व्होडाफोन, एअरटेल आदी कंपन्यांनंतर एअरसेलनेही या स्पर्धेत उडी घेतली असून, येत्या काळात रिलायन्सला टक्कर देण्यासाठी एअरसेल सज्ज झाली आहे. एअरसेलनेही ४१९ रूपयांचा प्लान लॉंच करत ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरसेलने लॉंच केलेल्या नव्या प्लान मध्ये ४१९ रूपयांमध्ये चक्क 2GB डेटा प्रतिदिन तसेच, अनलिमिटेड कॉलींग फ्री असणार आहे. एअरसेलची ही ऑफर ८४ दिवसांसाठी वैध असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स जिओच्या धन धना धन प्लानचीही वैधता ८४ दिवसच आहे. मात्र, रिलायन्स जिओ धन धना धन ऑफरमध्ये दिवसाला केवळ 1GB डेटा देते. एअरसेलच्या प्रिपेड प्लानची किंमत नॉर्थ ईस्ट मध्ये ४१९ रूपये तर, जम्मू-काश्मीरमध्ये ४४९ रूपये आहे. याशीवाय कंपनीने जम्मू काश्मीर सर्कलमध्ये एक २९९ रूपयांचा प्लानही लॉंच केला आहे.


जिओच्या प्लानमध्ये ३९९ रूपयांच्या प्लानमध्ये प्रतिदिन हाय स्पीड 1GB डेटा मिळणार आहे. जर प्रतिदिनची मर्यादा संपली तर त्यानंतर तुमच्या नेटचे स्पीड हळूहळू कमी कमी होत जाते. मात्र, तुमच्या प्लानचे लिमीट जर दररोजच संपत असेल तर, तुमचे इंटरनेट स्पीड 128kbp राहते.