मुंबई :  भारती एअरटेलने (Bharti Airtel) 5G सेवा सुरू केली आहे. लॉन्चनंतर कंपनीची 5G सेवा भारतातील अनेक शहरांमध्ये सुरू झाली आहे. तुम्हाला Airtel 5G Plus बद्दल सर्व माहिती सांगणार आहोत.  (airtel 5g plus service data internet know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Airtel 5G सेवा देशातील 8 शहरांमध्ये सुरु करण्यात आली आहे. ही सेवा सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथे सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल तर तुम्हाला Airtel 5G Plus सेवा मिळेल. 


मार्च 2023 पर्यंत देशातील बहुतांश शहरांमध्ये Airtel 5G Plus सेवा सुरू होईल. तर उर्वरित देशात 5G सेवा मार्च 2024 पर्यंत दिली जाईल, अशी माहिती कंपनीने दिलीय. 


एअरटेल 5जी प्लॅन


Airtel 5G Plus बाबत कोणताही नवीन प्लॅन लॉन्च करण्यात आलेले नाहीत. सध्या Airtel 5G Plus फक्त जुन्या 4G प्लॅनवर काम करेल. यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा रिचार्ज प्लॅन घेण्याची गरज नाही. म्हणजेच, जर तुमच्याकडे Airtel 5G Plus चे कव्हरेज असेल आणि तुमच्याकडे 5G हँडसेट असेल, तर तुम्ही सिम अपग्रेड किंवा नवीन प्लॅनशिवाय 5G चा आनंद घेऊ शकता.


5 जी स्पीड


ओकला (Ookla) 5 जीच्या स्पीडबाबत डेटा शेअर केला आहे. ओकलाच्या रिपोर्टनुसार कंपनीचा 5G स्पीड 516Mbps पर्यंत आहे. अनेक युजर्सनी याबाबत माहितीही शेअर केली आहे.