Airtel की Vodafone, नेमकी कोणती कंपनी देते सर्वांधिक स्वस्त प्लॅन?
टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच मोबाईल प्लॅनचे दर वाढवण्याची घोषणा केली होती.
मुंबई : टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच मोबाईल प्लॅनचे दर वाढवण्याची घोषणा केली होती. या दर वाढीच्या घोषणेने सामान्यांना मोठा शॉक बसला होता. मात्र अद्याप तरी ही दरवाढ अंमलात आणली नाही आहे, म्हणून काहीसा दिलासा आहे. मात्र आज आम्ही तूम्हाला एक सारखेच दर असणाऱ्या मात्र विविध ऑफर देणाऱ्या या कंपन्याच्या ऑफर्सची माहिती देणार आहोत.
Airtel आणि Vodafone या दोन्ही कंपन्या अनेक प्रीपेड प्लॅन देतात. या दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या युझर्सना
839 रुपयांचा समान प्लॅन देतात. मात्र या प्लॅनमध्ये खुप साम्य आहे. जर तुम्ही तीन महिन्यांचा प्लॅन घेत असाल आणि आणखी फायदे शोधत असाल तर आम्ही तुम्हाला या दोन कंपन्यांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत.
एअरटेल प्लॅन
एअरटेलच्या 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा म्हणजेच एकूण 168GB डेटा मिळेल.यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 84 दिवसांची वॅलिडीटी दिली जाते. तसेच या प्लॅनमध्ये Airtel द्वारे अधिक फायदे दिले जातात. तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar Mobile Edition, Xstream Mobile Pack, Amazon Prime Video Mobile Edition एक महिन्यासाठी, Apollo 24/7 सर्कल, Fastag वर रु. 100 कॅशबॅक दिले जातेय. तर विंक म्युझिकही दिली जात आहे.
वोडाफोनचे प्लॅन
वोडाफोनचा 839 चा प्लॅनची वॅलिडीटी 84 दिवसांची आहे. तर या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा म्हणजे एकूण 168GB डेटा देत आहेत. यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस दिला जातोय. याशिवाय युझर्सना Binge All Night ही सेवा देखील दिली जातेय. या ऑफरनुसार तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत कोणत्याही मर्यादेशिवाय नाईट डेटाचा आनंद घेऊ शकता. तसेच युझर्सना कंपनीकडून वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईट ऑफर देखील मिळतात.
दरम्यान जर आपण दोन्ही प्लान्सची तुलना केली तर Airtel आणि Vodafone या दोन्ही कंपन्यांच्या ऑफर जवजवळ एकसारख्याच आहेत. पण Vodafone चे प्लॅन सर्वांत चांगले आहेत. कारण त्यात Binge All Night ची सुविधा ग्राहकांना मिळतेय.