एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान लॉन्च
पुन्हा एकदा मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव नवीन योजना आणत आहे.
मुंबई : पुन्हा एकदा मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव नवीन योजना आणत आहे. सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी 'वर्क फॉर्म होम' सुरु आहे. Airtel, Jio आणि Vi सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कोरोना काळात जास्त इंटरनेटची गरज लक्षात ठेऊन जास्त वैधता असलेले डेटा प्लान आपल्या ग्राहकांसाठी आणले आहेत. जिओनंतर एअरटेलने (Airtel) ग्राहकांना ठिकवून ठेवण्यासाठी सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. (Airtel's cheapest prepaid plan)
एअरटेल आपल्या नव्या प्लानमध्ये वर्षभराची वैधता दिली आहे. हा एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात केवळ डेटा नव्हे तर कॉलिंग आणि एसएमएसचा सुद्धा समावेश आहे. (Airtel Cheapest 365 Days Prepaid Plan Rs 1498 In 2021 Comes 24gb Data And Unlimited Calling)
एअरटेलच्या (Airtel) या प्लानची किंमत 1498 रुपये आहे. यात एक वर्षभराची वैधता अर्थात 365 दिवस या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच 24 जीबी डेटा मिळणार आहे. तसचे एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम, फ्री ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅग खरेदीवर 100 रुपयांचा कॅशबॅक ऑफर आहे. मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, फ्री हेलोट्यून्स, फ्री विंक म्युझिक आदी ग्राहकांना मिळणार आहे.
दरम्यान, जिओ रिचार्ज केल्यानंतर 1299 रुपयांत एकूण 24 जीबी डेटा मिळतो. याची वैधता 336 दिवस पर्यंत आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत 3600 एसएमएस आहेत. तर Vi चा हा प्लान Airtel पेक्षा एक रुपये जास्त आहे. 1499 रुपयांत तुम्हाला 24 जीबी डेटा प्लस 3600 एसएमएस प्लस अनलिमिटेड कॉलिंग आहे. याची मुदत वर्षभर आहे.