नवी दिल्ली : सध्या दूरसंचार क्षेत्रात जबरदस्त स्पर्धा आहे. सर्व दूरसंचार (टेलीकॉम) कंपन्या स्पर्धेत टिकण्यासाठी रोज नवनव्या योजना आणत असतात. एअरटेल कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. २४९ रुपयांच्या प्लानवर मोफत लाइफ इन्शुरन्स देण्यात येत आहे. यासाठी कंपनीने एचडीएफसी लाइफ इन्शुरन्ससोबत करार केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२४९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना ४ लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स मोफत दिला जाणार आहे. जर तुम्ही हा प्लान पहिल्यांदाच खरेदी करत असाल तर इन्शुरन्सची सुविधा SMS द्वारा एनरोल करावी लागेल. त्याशिवाय एअरटेल अॅप किंवा दुकानातूनही या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. दुसऱ्या वेळेस रिचार्ज केल्यानंतर इन्शुरन्स स्वत:च अपडेट होतो. दुसऱ्यांदा त्याला एनरोल करण्याची आवश्यकता नसते. फ्री इन्शुरन्सचा फायदा १८ ते ५४ वर्षांपर्यंतचे यूजर्स घेऊ शकतात.


२४९ रुपयांच्या प्लानची सुविधा 


या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. त्याशिवाय लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलही मोफत मिळणार आहे. इंन्शुरन्ससाठी कोणत्याही प्रकारच्या पेपर वर्कची आवश्यकता नाही.


त्याशिवाय कंपनी ४९९ रुपयांपेक्षा कमी असणारे पोस्ट पेड प्लान हळू-हळू बंद करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. कंपनीने २९९ रुपयांचा प्लान बंद केला आहे. त्यानंतर आता कंपनी ३४९ आणि ३९९ रुपयांचा पोस्ट पेड प्लानही रद्द करणार आहे. ४९९ रुपयांपेक्षा अधिक असणाऱ्या प्लानची संख्या कमी होऊन केवळ तीन ७४९ रुपये, ९९९ रुपये आणि १५९९ रुपये ठेवण्यात येणार आहे.