Airtel Annual Prepaid Plan with Disney+Hotstar Subscription : आपल्या देशात एयरटेल (Airtel), रिलायंस जियो (Reliance Jio) आणि वोडाफोन आइडिया (Vodafone Idea) या तिन प्रमुख कंपन्या आहेत. आज आम्ही तुम्हाला एयरटेलच्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला एका वर्षाचा रिचार्ज करण्याची चिंता मिटेल. या प्लॅनमध्ये Disney+Hotstar चं सब्सक्रिप्शन मिळेल आणि आणखी बरेच फायदे सुद्धा मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Airtel ची तडफदार ऑफर
आम्ही तुम्हाला एयरटेल (Airtel) च्या ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगत आहोत तो एक प्रीपेड रिचार्ज प्लान आहे. एयरटेल (Airtel) कंपनीने बरेचशे अॅन्युअल प्रीपेड प्लॅन आहेत पण आम्ही तुम्हाला अशा अॅन्युअल प्लॅन बद्दल माहिती देत आहोत ज्याची किंमत 3 हजार 359 रुपये इतकी आहे. डेली डेटा सोबतच तुम्हाला ओटीटी सब्सक्रिप्शन आणि आणखी भरपूर फायदेसुद्धा मिळणार आहेत.


काय आहेत या प्लॅनचे फायदे?
एयरटेल (Airtel) च्या  3 हजार 359 रुपयांच्या वार्षिक प्लॅन सोबतच तुम्हाला 2.5 जीबी डेली डेटा मिळतो आहे म्हणजेच तुम्हाला एकुण 912  जीबी 365 दिवसांसाठी मिळणार आहे. जेव्हा तुमचा डेली डेटा संपेल तेव्हा तुमच्या इंटरनेटची स्पीड कमी होईल आणि ती 64Kbps इतकी असेल.


या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्क सोबक अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि प्रत्येक दिवसासाठी 100 एसएमएस मिळणार आहे. विशेष म्हणजे या सर्व फायद्यांसोबतच तुम्हाला 
Disney+Hotstar मोबाईल सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.


तसेच, एयरटेल (Airtel) असाच आणखी वार्षिक प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे, ज्याची किंमत 2 हजार 999 इतकी आहे. या प्लॅन सोबतच तुम्हाला ते सर्व फायदे मिळतील जे 3 हजार 359 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एका फायदा नाही मिळू शकणार आणि तो म्हणजे ओटीटीच सब्सक्रिप्शन. या 2 हजार 999 च्या प्लॅनमध्ये मिळणारा Disney+Hotstar Mobile सब्सक्रिप्शन मिळू शकणार नाही.