एअरटेलचा 398 रु.चा प्लान..जियोला देणार टक्कर ?
एअरटेलने भारतात नवा प्रीपेड प्लान लॉन्च केलायं.
मुंबई : टेलीकॉम सेक्टरमध्ये जियोने धमाकेदार एन्ट्री केल्यानंतर सर्वच कंपन्यांचे धाबे दणाणले. एअरटेलने भारतात नवा प्रीपेड प्लान लॉन्च केलायं. एअरटेलने 398 रुपयांमध्ये नवा प्लान बाजारात आणलायं. या प्लाननुसार ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा आणि अनलिमिटेड वॉईस कॉलिंग मिळणार आहे. या प्लानची वॅलिडीटी 70 दिवसांसाठी असणार आहे. एअरटेलच्या सर्व ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
या प्लाननुसार ग्राहकांना दररोज 1.5 जीबी 3जी / 4जी डेटा, अनलिमिटेड वॉईस कॉल (लोकल, एसटीडी, नॅशनल रोमिंग) आणि दररोज 90 एसएमएस मिळणार आहेत.
399 रु. प्लान
एअरटेलच्या पोर्टफोलियोमध्ये 399 रुपयांचा प्लानदेखील आहे. पण तुलना केली असता या प्लानमध्ये 398 रुपयांइतक्या ऑफर मिळत नाहीयेत.
एअरटेलच्या 399 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 1 जीबी 3 जी / 4 जी डेटा, अनलिमिटेड वॉईस कॉल (लोकल, एसटीडी आणि रोमिंग) आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात.
प्लानची वॅलिडीटी वेगवेगळ्या सर्कलनुसार 70 आणि 84 दिवसांची आहे.
जियोचा प्लान
याची तुलना जियोच्या 398 रुपयांच्या प्लानशी केली तर यामध्ये दररोज ग्राहकांना 2 जीबी डेटा मिळतोय, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस मिळतायत.
जियोच्या अॅपचे फ्री सबस्क्रीप्शनही ग्राहकांना मिळतंय. जियोच्या या प्लानची किंमत 398 रुपये असून याची व्हॅलिडीटीही 70 दिवसांची आहे.