नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी ऑफर अंतर्गत ३९९ रुपयांच्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक देण्याची घोषणा केली. या ऑफरला टक्कर देणारी ऑफर एअरटेलने लॉन्च केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओच्या या ऑफरनुसार ग्राहकांना ३९९ रुपयांच्या रिचार्जवर ५०-५० रुपयांचे ८ कूपन्स मिळणार आहेत. हे कुपन्स युजर्स भविष्यात रिचार्ज करण्यासाठी वापरु शकतात. जिओने लॉन्च केलेल्या या प्लॅननंतर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या एअरटेलने दिवाळीच्या मुहूर्तावर एक नवा प्लॅन सादर केला आहे.


एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी अनलिमिटेड वॉईस कॉल असलेला पॅक लॉन्च केला आहे. कंपनीने 'मायप्लॅन इनफिनिटी' अंतर्गत ९९९ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनचा फायदा नव्या आणि जुन्या दोन्ही ग्राहकांना होणार आहे. या प्लॅनमध्ये पोस्टपेड ग्राहकांसाठी अनलिमिटेड वॉईस कॉल (लोकल+एसटीडी), रोमिंगमध्ये इनकमिंग कॉल आणि आऊटगोइंग कॉलवर कुठलंही चार्ज लागणार नाहीये.


नव्या ऑफर अंतर्गत एअरटेलच्या युजर्सला कंपनीतर्फे ५०जीबी ३जी/४जी डेटा ऑफर केली जात आहे. ५०जीबीचा मोफत डेटाचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना ५० पैसे प्रति एमबीच्या दराने १,००० रुपयांपर्यंत डेटा वापरता येणार आहे.


या प्लॅनची खासबाब म्हणजे ९९९ रुपयांत ग्राहकांना ६ महिन्यांपर्यंत स्क्रिन रिप्लेसमेंटची ऑफर देण्यात येत आहे. यापूर्वी एअरटेलने ९९९ रुपयांचा प्रिपेड प्लॅन सादर केला होता. त्यामध्ये २८ दिवसांची वैधता होती आणि प्रत्येक दिवशी २५० मिनिट फ्री कॉलिंग सुविधा होती. तर आठवड्याला १,००० मिनिटं मिळणार होती.