मुंबई : भारतातली सगळ्यात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी एअरटेलनं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांसाठी नवा प्लॅन लॉन्च केला आहे. रिलायन्स जिओच्या ९९९ रुपयांमध्ये 90GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगच्या ९० दिवसांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं हा प्लॅन आणला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्लॅननुसार ग्राहकांना दिवसाला 4GB 3G/4G डेटा २८ दिवसांसाठी मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना २८ दिवसांसाठी 112GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. हा प्लॅन सुरू करण्यासाठी ग्राहकांना ९९९ रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. तसंच एअरटेल पेमेंट बँकच्या माध्यमातून रिचार्ज करणाऱ्यांना ५० टक्के डिस्काऊंट देण्यात येणार आहे.


एअरटेलचा हा प्लॅन ठराविक ग्राहकांसाठीच असणार आहे. तुमच्या नंबरवर हा प्लॅन उपलब्ध आहे का नाही ते पाहण्यासाठी माय एअरटेल अॅप चेक करावं लागणार आहे.


हे आहेत एअरटेलचे आणखी काही प्लॅन्स


६९५ रुपयांमध्ये एअरटेल टू एअरटेल अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल आणि 500MB 2G/3G/4G डेटा ८४ दिवसांसाठी


७९५ रुपयांमध्ये एअरटेल टू एअरटेल अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल तसंच 1GB 4G/3G/2G डेटा ८४ दिवसांसाठी


७९९ रुपयांमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल तसंच दिवसाला 3GB डेटा


८९९ रुपयांमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल. तसंच 6GB डेटा २७ दिवसांसाठी. 4G हँडसेट आणि 4G सीमकार्ड असणाऱ्या ग्राहकांना दिवसाला 3.5GB डेटा 


११९८ रुपयांमध्ये अनलिमिटेड एसटीडी आणि लोकल कॉल. दिवसाला 9GB डेटा २७ दिवसांसाठी. 4G हँडसेट आणि 4G सीमकार्ड असणाऱ्या ग्राहकांना दिवसाला 5GB डेटा