नवी दिल्ली : टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्या दररोज नवनव्या ऑफर्स सादर करत आहेत. रिलायन्स जिओ पासून एअरटेल, वोडाफोनपर्यंत सर्वांनी आपल्या प्लान्सचे दर कमी केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेटा वॉर मध्ये स्वस्त प्लान देण्यासोबतच स्पेशल ऑफर्सही दिल्या जात आहेत. तसेच कॅशबॅक सारख्याही ऑफर्स दिल्या जात आहेत. नुकतेच रिलायन्स जिओने रेडमीसोबत मिळून कॅशबॅकची ऑफर दिली होती.


एअरटेलची स्वस्त आणि मस्त ऑफर


आता एअरटेलने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना खूपच स्वस्तात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. 


एअरटेलची जबरदस्त ऑफर


एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी केवळ ९ रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची खास गोष्ट अशी की, ग्राहकांना जे १०० रुपयांच्या प्लानमध्ये मिळतं ते सर्वकाही ९ रुपयांत मिळणार आहे.


अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री डाटा


एअरटेलच्या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, १०० SMS आणि १०० MB इंटरनेट डेटा मिळणार आहे. हा सर्वात स्वस्त प्लान असल्याचं बोललं जात आहे. 


प्लानची वैधता किती?


एअरटेलचा हा प्लान सर्व ऑपरेटिंग सर्कल्समध्ये उपलब्ध असणार आहे. युजर्स ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक्त इतर ठिकाणी रिचार्ज करुन हा प्लान घेऊ शकतात. या प्लानची वैधता एका दिवसाची आहे.