मुंबई : टेलीकॉम सेक्टरमध्ये जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने 399 रुपयांच्या प्लानमधईल डेटा लिमिट वाढवली आहे. याआधी कंपनी दरदिवशी 1.4 जीबी डेटा उपलब्ध करत असे. आता युझर्सना या प्लानमध्ये दरदिवशी 2.4 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये करण्यात आलेला बदल हा काही निवडक युजर्ससाठीच आसणार आहे. एअरटलच्या या प्लानमुळे जिओला जोरदार टक्कर मिळणार आहे.


एअरटेलचा 388 रुपयांचा प्लान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलच्या 399 रुपयांच्या प्लानची वॅलिडीटी 70 दिवसांची असून त्यात अनलिमिटेड कॉल्स दिले जातात. यामधील निवडक युजर्सना 84 दिवसांची वॅलिडीटी उपलब्ध केला जाणार आहे. म्हणजेच या निवडक ग्राहकांना 399 रुपयांमध्ये 84 दिवसांच्या वॅलिडिडीसह दरदिवशी 2.4 जीबी डेटा आणि रोज 100एसएमएस आणि अनलिमिटेड वॉईस कॉल दिले जाणार आहेत. याचा अर्थ साधारण 1,97 रुपयांमध्ये 1 जीबी डेटा मिळू शकणार आहे.


जिओ चा 399 चा प्लान 


जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 399 रुपयांचा प्लान आणलाय. याची वैधता 84 दिवसांची असून युजर्सना प्रतिदिन 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. कंपनीतर्फे दरदिवशी 100 एसएमएस मोफत दिले जातात.तसेच डिजीटल कंटेटदेखील मिळतो.