मुंबई : २०२० या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एयरटेलने ग्राहकांना धक्का दिला आहे. एयरटेलने २३ रुपयांचा बेस रिचार्ज प्लान बंद केला आहे. आता प्रीपेडसाठीच्या या बेस प्लानची किंमत ९५ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. २३ रुपयांचा हा बेस प्लान आता ग्राहकांना ४५ रुपयांना मिळणार आहे. एयरटेलने याबाबातची माहिती दिली आहे. ४५ रुपयांचा या प्लानमध्ये २३ रुपयांच्या प्लानच्या सुविधा मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४५ रुपयांच्या या बेस प्लानमध्ये स्थानिक आणि एसटीडी कॉलिंग २.५ पैसे प्रती सेकंद, व्हिडिओ कॉल ५ पैसे प्रती सेकंद आणि इंटरनेट डेटा ५० पैसे प्रती एमबी आकारण्यात येणार आहेत. याशिवाय एसएमएस १ रुपया, राष्ट्रीय एसएमएस १.५ रुपये आणि आंतरराष्ट्रीय एसएमएस ५ रुपये एवढं शुल्क द्यावं लागणार आहे. ४५ रुपयांच्या या प्लानची वैधता २८ दिवस असणार आहे.


एयरटेलच्या ग्राहकांना २८ दिवसांनंतर कमीत कमी ४५ रुपयांचं रिचार्ज करणं बंधनकारक आहे. २८ दिवसानंतरही कंपनीने १५ दिवसांचा वाढीव कालावधी दिला आहे. या १५ दिवसानंतरही ग्राहकाने जर रिचार्ज केलं नाही तर सेवा निलंबित करण्यात येणार आहे.