‘जिओ’ला टक्कर ?: एअरटेलचा जबरदस्त प्लान
रिलायन्स जिओने देऊ केलेल्या 4जी इंटरनेट आणि फ्रि कॉलिंग सुविधेनंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही या स्पर्धेत उतरल्या आहेत.
एअरटेलने आपल्या 4जी ग्राहकांसाठी जबरदस्त प्लान आणला आहे. हा प्लान ३९९ रुपयांचा असून यामध्ये ग्राहकांना ८४ दिवस ८४ जीबी डेटा तसेच यासोबत फ्रि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. हा प्लान रिलायन्स जिओच्या ३९९ च्या प्लान प्रमाणेच असून एअरटेल हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी आणला आहे.
एअरटेलची ही ऑफर केवळ ४जी फोन आणि ४ जी सिम कार्ड असलेल्या ग्राहकांसाठीच उपलब्ध असणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीने 244 रुपयांमध्ये 70 दिवसांसाठी १ जीबी डेटा दिला आहे. यामध्ये एअरटेलने ग्राहकांना फ्रि कॉलिंगची सुविधा दिली आहे. एअरटेलच्या वेबसाइट यासंबधीची माहिती देण्यात आली आहे.
रिलायन्स जिओने स्वस्त ऑफर्स आणल्याने टेलिकॉम कंपन्यांमध्ये ‘प्राइस वॉर’सुरु केले आहे. इतर कंपन्याही कमी दरात जास्तीत जास्त डेटा देण्याचा प्रयत्न करुन ग्राहकांना थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. टेलीकॉम कंपन्यांच्या या प्राइस वॉरमध्ये ग्राहकांचा जास्तीत जास्त फायदा होवो हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोणाचा ४ जी स्पीड सर्वात अधिक
जिओ, वोडाफोन, आयडिया, एअरटेल या देशात ४ जी इंटरनेट देणाऱ्या अग्रगण्य टेलीकॉम कंपन्या आहेत. यामध्ये रिलायन्स जिओची डाऊनलोड स्पीड जुलैमध्ये १८.६५ mbps अशी सर्वात अधिक नोंद झाली. एअरटेल यामध्यो चौथ्या स्थानावर आहे. भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (ट्राई) च्या मायस्पीड पोर्टलनुसार हे सर्वेक्षण नोंदविण्यात आले आहे. यामध्ये एअरटेलचा स्पीड ८.९१ mbps नोंदवला गेला आहे. वोडाफोन ११.०७ mbps स्पीडवर दुसऱ्या स्थानावर आहे तर ९.४६ mbps स्पीडने आयडिया तीसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून आले.