जिओनंतर एअरटेलनेही आणला ४९ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओनंतर आता एअरटेलनेही प्रीपेड युजर्ससाठी दोन नवे इंटरनेट पॅक जाहीर केलेत. यातील पहिला प्लान १९३ रुपयांचा आहे.
मुंबई : रिलायन्स जिओनंतर आता एअरटेलनेही प्रीपेड युजर्ससाठी दोन नवे इंटरनेट पॅक जाहीर केलेत. यातील पहिला प्लान १९३ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये युझरला १ जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. तर दुसऱा प्लान ४९ रुपयांचा आहे. यात युझरला १ जीबी डेटा मिळणार आहे. या दोन्ही प्लानचा फायदा कस्टमरला पहिल्यापासून सुरु असलेल्या अनलिमिटेड पॅकमध्ये अॅड ऑन होऊन मिळणार. प्लानची व्हॅलिडिटी आधीइतकीच राहील. एअरटेलने ही नवी ऑफ रिलायन्स जिओ आणि आयडियाला टक्कर देण्यासाठी मैदानात आणलीये.
एअरटेलच्या या अॅड ऑनचा फायदा केवळ पंजाब सर्कलमधील युझरना मिळणार आहे. याआधी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्लानचा फायदा मिळतोय. १९३ रुपयांच्या प्लानमध्ये १ जीबी डेचा प्रति दिवसाला मिळतो. उदाहरणार्थ जर तुम्ही ३४९ रुपयांचा प्री पेड अनलिमिटेड कॉम्बो प्लान घेतलाय तर तुम्हाला दिवसाला २. ५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय १९३ रुपयांचे अतिरिक्त रिचार्ज केल्यास दिवसाला १ जीबी डेटा मिळेल.
याप्रमाणे तुम्हाला दिवसाला ३.५ जीबी डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असेल. १९३ रुपयांच्या प्लानचा फायदा एअरटेलच्या आधीपासून सुरु असलेल्या १९९, ३९९, ४४८ आणि ५०९ रुपयांच्या प्लान्सलाही लागू असेल. याशिवाय एअरटेलच्या नव्या ४९ रुपयांच्या अॅड ऑन प्लॅनमध्ये युझरला १ जीबी डेटाचा फायदा मिळणार आहे. याचा अर्थ ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये अतिरिक्त एका महिन्यासाठी १ जीबी डेटा मिळेल.