Whatsapp नंतर Airtel कडून ग्राहकांसाठी खास भेट, ही खास सेवा सुरू
एअरटेल कंपनीने ग्राहकांसाठी कोणती सुविधा आणली आहे आणि त्याचा कसा वापर करायचा जाणून घ्या.
मुंबई : देशात लॉकडाऊनंतर आणि कोरोनामुळे ऑनलाइन पेमेंट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. गुगल पे, फोन पेच नाही तर आता Whatsapp ने देखील आता पेमेंट सेवा सुरू केली आहे. या स्पर्धेत उतरण्यासाठी आता मोबाईल कंपन्या देखील सरसावल्या आहेत. Airtel नं ग्राहकांसाठी खास सेवा सुरू केली आहे.
ऑनलाइन पेमेंटचे वेगवेगळे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. Whatsapp नंतर आता एअरटेल कंपनीने ग्राहकांसाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने Airtel Safe Pay नावानं ऑनलाइन पेमेंट सर्व्हिसची सुरुवात केली आहे.
या सेवेमुळे ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करणं अगदी सोयीचं होणार आहे. याशिवाय Airtel Safe Pay वापरणाऱ्या सर्व युझर्सची माहिती गोपनीय, सुरक्षित ठेवण्यात येईल. असं कंपनीच्या वतीनं युझर्सना सांगण्यात आलं आहे.
युझर्सने ही सेवा सुरक्षितपणे वापरू शकतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा होणार नाही अशी ग्वाही कंपनीच्या वतीनं प्रेस रिलीजमधून देण्यात आली आहे. ही सेवा जास्त सुरक्षित असल्यानं ग्राहकांनी काळजी करू नये असं देखील त्यामध्ये म्हटलं आहे. या सेवेमुळे युझर्सना आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना सहज पेमेंट करता येणार आहे.
कसा घ्याल Airtel Safe Pay सुविधेचा लाभ?
- Airtel Safe Pay सेवा ही Airtel Payment bank मधून युझर्सना सुरू करावी लागणार आहे.
- सर्वात पहिल्यांदा एअरटेल युझर आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करा. त्यानंतर Airtel thanks app उघडा.
- त्यावर आपल्याला पेमेंट बँक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर आपलं अकाऊंट Add करा. Enable Safe Pay असा पर्याय दिसेल.
- Enable पर्याय केल्यानंतर UPI पेमेंट करण्याचा पर्याय येईल. तिथे विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर द्या.
- जेव्हा जेव्हा ट्रॅन्झाक्शन केलं जाईल तेव्हा एअऱटेलकडून युझर्सना कायम मेसेज अलर्ट येईल असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.