एअरटेल बंद करणार आपली `ही` सेवा!
टेलिकॉम क्षेत्रात वाढत चाललेल्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी एअरटेल नवनव्या योजना बनवत आहे.
नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रात वाढत चाललेल्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी एअरटेल नवनव्या योजना बनवत आहे. या योजना राबवण्यासाठी एअरटेल आपली ३ जी सेवा बंद करत आहे. एअरटेल इंडीया आणि साऊथ आशियाचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टल यांनी सांगितले की, त्यांनी ३ जी सर्व्हिस वर इन्वेस्टमेंट करणे बंद केले आहे. अशामध्ये 3G ने खाली झालेल्या स्पेक्ट्रम चा वापर 4G सर्विस केला जाईल. जुलै -सप्टेंबर मध्ये कंपनीने डेटा कस्टमर्स ४ पटीने वाढले आहेत. त्याचबरोबर मोबाईल ब्रॉडब्रँड कस्टमर्सची संख्या ३३.६ % वाढून ५.५२ कोटी झाली आहे.
3G सर्व्हिस बंद करण्याच्या तयारीत :
एअरटेलच्या या तीन महिन्यांच्या परिणामांनंतर गोपाल विट्टल म्हणाले की, पुढील ३-४ वर्षात 3G नेटवर्क बंद होईल. भारतात विकले जाणारे सुमारे ५०% फोन हे फिचर्स फोन आहेत. कंपनीच्या 3G सेवेमध्ये कामी येणारे २१०० मेगाहर्ट्ज बँडचा वापर 4G सेवेसाठी केला जाईल.
कंपनीचा भर 4G वर :
4G टेक्निक वर अधिक भर दिला जाणार.
यात डेटा कॅपेसिटी अधिक असेल.
कंपनी २१०० मेगाहर्ट्ज बँडचा वापर 4G साठी करणार. जो आतापर्यंत 3G साठी केला जात होता.
कंपनी अधिकतर स्पेक्ट्रमचा वापर 4G साठी करणार.
3G नेटवर्कचा वापर 4G साठी :
कंपनीचे अनेक ठिकाणी असलेले 3G अॅडवान्सड नेटवर्क 4G ला सपोर्ट करेल.
अशा ठिकाणी कंपनी 4G सेवा सुरु करणार. मात्र प्रत्येक ठिकाणी उपकरण बदण्यासाठी काही अवधी लागेल.