Home Surveillance Solution : जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने घरापासून दूर राहण्याची सक्ती केली जात असेल, तर एअरटेलने सुरू केलेली ही सुविधा तुम्हाला खूप मदत करणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. वास्तविक, घरापासून दूर राहून आपल्या प्रियजनांची चिंता करणाऱ्या लोकांसाठी एअरटेलने जबरदस्त सुविधा सुरु केली आहे. भारती एअरटेलने (Bharti Airtel) ग्राहकांना त्यांच्या प्रियजनांवर लक्ष ठेवण्याची अनुमती देणारे फीचर्स लॉन्च केले आहे. त्यामुळे तुम्ही आता दुसरीकडे असाल तरीही घराकडे लक्ष ठेवू शकणार आहात.


40 शहरांमध्ये ही सेवा सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला 40 शहरांमध्ये सुरू करण्यात आलेली ही सुविधा ग्राहकांना टू-वे कम्युनिकेशन सिस्टीमद्वारे घरबसल्या कोठूनही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही बोलू शकणार आहात. याआधी मुंबई, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यासह 40 शहरांमध्ये XSafe सुविधा सुरु करण्यात आली आहे. एकदा जोडणी केल्यानंतर कंपनी पहिल्या कॅमेर्‍यासाठी वार्षिक 999 रुपये आणि दुसर्‍या कॅमेर्‍यासाठी प्रति वर्ष 699 रुपये आकारेल.


टू-वे कम्‍युन‍िकेशन स‍िस्‍टम


भारती एयरटेल होम्स के मुख्य कार्यपालक अधिकारी (सीईओ) वीर इंदर नाथ, म्हणाले एक द्विमार्गी संप्रेषण प्रणाली  ही सुरु करण्यात आली आहे. आम्ही आमच्या ग्राहकांचे सतत काहीना काही देत आहोत. कोविड-19 साथीच्या आजारानंतर, ग्राहकांनी घरापासून दूर असताना आपल्या प्रियजनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “XSafe हे घरातील देखरेखीचे उपाय आहे. जे ग्राहकांना त्यांच्या प्रियजनांवर लक्ष ठेवण्यास अनुमती देते. या सुविधेमुळे ग्राहकांना टू-वे कम्युनिकेशन सिस्टीमद्वारे घरबसल्या कुठूनही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संवाद साधू शकता.


कंपनीच्या म्हणण्यानुसार, 'स्टोरेज' क्लाउडवर सात दिवसांसाठी उपलब्ध असेल, ज्यामुळे यूसर्सना कोणत्याही रिमोट ठिकाणाहून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मिळू शकेल.