Samsung कंपनीकडून Alert! हे काम आताच करा नाहीतर डीलीट होणार संपूर्ण डेटा
दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने जगभरातील यूझर्सना अलर्ट जारी केला आहे.
मुंबई : जर तुम्ही सॅमसंग मोबाईल यूजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने जगभरातील यूझर्सना अलर्ट जारी केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, कंपनी आपली इमेज बॅकअप सेवा बंद करणार आहे. अशा परिस्थितीत, सॅमसंग क्लाउडचा भाग असलेल्या सर्व वापरकर्त्यांनी त्यांच्या डेटाचा शक्य तितक्या लवकर बॅकअप घ्यावा. कंपनी आता यूझर्सना आठवण करून देत आहे की, कंपनी पुढील महिन्यापर्यंत सर्व फोटो काढून टाकेल.
सॅमसंग क्लाउड सेवा बंद केली जाईल
जर तुम्हाला या सेवेबद्दल माहिती नसेल, तर हे माहित असू द्या की, कंपनी ही त्यांच्या यूझरला क्लाउड सेवा वापरण्यासाठी मर्यादित प्रमाणात स्टोरेज पुरवते. सॅमसंग क्लाउड सेवेचा वापर करून, तुम्ही नुसतेच फोटो व्हिडीओ नाही तर तुम्ही तुमचे Contacts, Calenderच नव्हे, तर Notes देखील सेव्ह करुन ठेऊ शकतात.
जर तुम्ही देखील सॅमसंगची ही सेवा वापरत असाल, तर तुमच्यावर देखील या गोष्टीचा परिणाम होणार आहे. कंपनीने यासाठी मुदतही दिली आहे. जर यूझर्सने अंतिम मुदतीनंतरही त्यांच्या डेटाचा बॅक अप घेतला नाही, तर त्यांचा डेटा कंपनीकडून हटवला जाईल.
सॅमसंगचे काय म्हणणे आहे?
कंपनीचे म्हणणे आहे की, कंपनीने यूझर्सना दोन प्रकारच्या गटांमध्ये ठेवले आहे.. ज्यांना गट 1 मध्ये स्थान देण्यात आले आहे त्यांना त्यांचा डेटा डाउनलोड करण्यासाठी 30 सप्टेंबर अखेरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्यांना गट 2 मध्ये ठेवण्याच आले आहेत, त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत त्यांचा डेटा डाउनलोड करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना या तारखेपूर्वी त्यांच्या डेटाचा बॅकअप घ्यावा लागेल.
सॅमसंग क्लाउड वरून आपला डेटा कसा डाउनलोड करावा
1. सर्वप्रथम, सॅमसंग फोनच्या सेटिंग्जवर जा आणि नंतर सर्वत वरती दिसणारे Samsung Cloud शोधा.
2. नंतर Samsung Cloud वर क्लिक करा.
3. येथे तुम्हाला तुम्ही वापरलेला डेटा दिसेल.
4. येथे गॅलरी, इतर सिंक केलेला डेटा, सॅमसंग क्लाउड ड्राइव्ह, बॅकअप डेटा, रिस्टोर डेटा आणि डिलीट बॅकअप सारखे पर्याय दिले जातील.
5. येथे तुम्हाला बॅकअप डेटावर क्लिक करावे लागेल.
6. याला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल.
काही वापरकर्त्यांनी त्यांचे OneDrive खाते देखील याला कनेक्ट केले आहे. जर तुम्ही देखील या वापरकर्त्यांपैकी एक असाल, तर तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड स्टोरेजमध्ये तुमचा डेटा बॅकअप घेऊ शकता. इथे तुम्हाला फक्त 5 जीबी जागा मिळते. जर वापरकर्त्याला यापेक्षा अधिक जागा हवी असल्यास तुम्ही त्यांना पैसे द्यावे लागतील.