Amazon वर श्रीकृष्णाचे अश्लील पेंटींग, नेटकऱ्यांकडून उमटला #Boycott_Amazon चा सूर
ऑनलाईन ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन पुन्हा एकदा वादात सापडला आहे. भगवान श्रीकृष्णाचा अनादर केल्यामुळे नेटकऱ्यांनी अॅमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Boycott Amazon : ऑनलाईन ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन पुन्हा एकदा वादात सापडला आहे. भगवान श्रीकृष्णाचा अनादर केल्यामुळे नेटकऱ्यांनी अॅमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी युझर्सने ट्विटरवर #Boycott_Amazon हे कॅम्पेन सुरू केले आहे. अॅमेझॉनने आपल्या वेबसाईटवर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने भगवान श्रीकृष्ण यांचे अश्लील पेटींग विक्रीसाठी दाखवण्यात आले. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे युझर्सने #Boycott_Amazon टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही अॅमेझॉनकडून अशा गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे यावेळी कडक कारवाई करण्याची मागणी नेटकरी करीत आहेत.
Amazon India आणि Exotic India वर श्रीकृष्णाचे अश्लील पेंटींग विक्रीला
ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India आणि Exotic India यांच्या एका पेंटिंगने Amazon पुन्हा वादात सापडले आहे. या पेंटिंगमध्ये भगवान कृष्ण आणि राधा यांचे अश्लील पेंटिंग काढण्यात आले. हे पेंटिंग अॅमेझॉनवर गीता गोविंदा, राधाकृष्ण इन फॉरेस्ट लव्ह या नावाने विकले जात आहे. या पेंटिंगची फ्रेम साइज १२×१३ इंच देण्यात आली आहे.
ट्विटरवर नेटकरी संतापले
अॅमेझॉनच्या या कृत्याच्या सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, अनेक युझर्सनी सोशल मीडियावर #Boycott_Amazon हे कॅम्पेन सुरू केले आहे. काही युझर्सनी आपल्या मोबाईलचा स्क्रीन शॉट शेअर करत अॅमेझॉनचे अॅप डिलिट केल्याचीही माहिती दिली. तर अनेकांनी हे अॅप डिलिट करण्याचे आवाहनही केले आहे. तसेच ट्विटरवर लिहिले की, जन्माष्टमीला भगवान कृष्णाचे चित्र अशा प्रकारे प्रदर्शित करणे हा कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान आहे.