न्यूयॉर्क :  जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मिळाला आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात शुक्रवारी अ‍ॅमेझॉनच्या शेअर्सनी १३.५ टक्क्यांपर्यंत मजल मारली. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या बिल गेट्स यांची संपत्ती ८९ अब्ज डॉलरच्या घरात आहे. तर बेझोस यांची संपत्ती ९० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस हे या आधीही जुलैमध्ये काही तासांसाठी ठरले होते. जेफ बेझोस यांच्या कंपनीचे समभाग अचानक उसळले आणि त्यांना सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला होता. ही माहिती 'फोर्ब्स' नियतकालिकाने जाहीर केली होती.


मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून बेझोस हे पहिल्या क्रमांकावर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर अ‍ॅमेझॉनचे समभाग पुन्हा १ टक्क्याने घसरून १,०४६ डॉलरवर आले होते. त्यामुळे बोझेस हे पुन्हा दुसऱ्या स्थानी जाऊन बिल गेट्स पहिल्या क्रमांकावर आले होते. यापूर्वी कंपनीच्या एका समभागाची किंमत अ‍ॅमेझॉनच्या समभागांनी उसळी घेतल्यानंतर १,०८३.३१ डॉलर झाली होती.