Nokia G21 : अ‍ॅमेझॉनवर (Amazon) सध्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (Great Indian Festival Sale) सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर (smartphone) मोठी सूट दिली जात आहे. तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल, पण बजेट कमी असेल तर या सेलमध्ये तुमच्यासाठी खास ऑफर (offer) आहेत. तुम्हाला जर कमी किंमतीत मजबूत बॅटरी (Battery) असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या सेलचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.  (Amazon Great Indian Festival 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळी मार्केट गाजवलेले स्मार्टफोन पुन्हा एकदा बाजारात आले आहेत. नोकियाचे स्मार्टफोन (Nokia smartphone)सर्वात मजबूत आणि स्टायलिश मानले जातात. या सेलमध्ये Nokia G21 हा स्मार्टफोन  तुम्ही फक्त  849 मध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची मूळ किंमत जवळपास 12,499 आहे. मात्र तो तुम्हाला केवळ 849 मध्ये मिळणार आहे.


Nokia G21 (4GB RAM + 64GB स्टोरेज) ची लॉन्चिंग किंमत 14,499 रुपये आहे. पण Amazon वर हा स्मार्टफोन 12,499 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर 2 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यानंतर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल.


एक्सचेंज ऑफर


Nokia G21 वर 11,650 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला मोठी सूट मिळू शकते. पण 11,650 रुपयांची सूट फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच मिळणार आहे. जर तुम्ही या एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळवू शकलात तर हा फोन तुम्हाला केवळ 849 रुपयात मिळेल. 


 जर तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करायचा नसेल किंवा चांगली एक्सचेंज ऑफर मिळत नसेल, तर बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. तुम्ही भारतीय स्टेट बॅंकेचे ( SBI) क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला हजार रुपयाची सूट मिळेल. यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल.