मुंबई:सेल सेल सेल..... अमेझॉने ग्राहकांसाठी 2019 मध्ये पहिल्याच सेलची घोषणा केली आहे. अमोझॉन ग्रेट इंडियन सेल 20 ते 23 जानेवारी पर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे. तिन दिवसांच्या सेल मध्ये एचडीएफसीच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड वर 10% इंन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. अमोझॉन ग्रेट इंडियन सेल मध्ये मोबाईल, वॉशिंग मशिन, लॅपटॉप असे एकापेक्षाएक उपकरणांवर सूट दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या स्मार्टफोनवर आहे सूट


सेलमध्ये स्मार्टफोनवर नो-कॉस्ट EMI आणि एक्स्चेंज ऑफर दिले गेले आहेत. डिस्काउंट मध्ये मिळणाऱ्या फोन्सच्या यादीत OnePlus 6T,शियोमीचा रेडमी Y2,Huawei Nova 3i,Honor 8X,Vivo V9,iphone X इतर अनेक मोबाईलवर ऑफर आहे.


या व्यतिरिक्त लॅपटॉप, हेडफोन्स, हार्ड ड्राइव कॅमेरा अश्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर 60% पर्यंत सूट दिली जाणार आहे. अमेझॉन टिव्ही आणि इतर उपकरणांवर 50% सूट मिळणार आहे.लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांसाठी खास ऑफर आहे. ग्राहक 30,000 रुपयांपर्यंत डिस्काउंटवर खरेदी करु शकतात.


सगळ्यात आधी या ग्राहकांना मिळणार फायदा



अमेझॉन प्राईम मेंबर्स यांना संधीचा फायदा घेता येणार आहे.19 जानेवारी दुपारी 12 वाजेपासून वस्तू खरेदी करता येणार आहे.