नवी दिल्ली : सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट असलेल्या Amazon.com ने नव्या पॉलिसीवर काम करणं सुरु केलं आहे. काही दिवसांपूर्वी Amazon सोबतच इतरही ई-कॉमर्स वेबसाईट्सने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक दमदार ऑफर्स सादर केल्या होत्या. यामध्ये Amazonने रिटर्न पॉलिसी सुरु केली होती, यामध्ये कंपनी सामानाची डिलिव्हरी झाल्यावर ३० दिवसांत सामान पुन्हा परत घेत होती. म्हणजेच Amazon वरुन खरेदी करण्यात आलेली वस्तू तुम्हाला आवडली नाही तर तुम्ही ती पुन्हा परत करु शकता.


कुठलीही सूचना न देता करत आहे बॅन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Amazon ने दिलेल्या सुविधेनंतर सामान परत करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच आता Amazonने नवी पॉलिसी बनवली आहे. या पॉलिसीनुसार बहुतांश वेळा वस्तू परत करणाऱ्या ग्राहकांवर कंपनीतर्फे लाईफ-टाईम बॅन लावण्यात येत आहे. Amazon तर्फे करण्यात येणारी ही कारवाई कुठल्याही सूचनेशिवाय करण्यात येत आहे.


वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, Amazon ग्राहकांना काही दिवसांपूर्वी ई-मेल मिळाला ज्यामध्ये म्हटलं आहे की, तुम्ही नियोजित करण्यात आलेल्या संख्येपेक्षा अधिक वेळा वस्तू परत केल्याने तुमच्यावर बंदी घालण्यात येत आहे.


काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की, १० टक्के प्रोडक्ट परत करणाऱ्या ग्राहकांवर बंदी घालण्यात येत आहे. या संदर्भात स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाहीये. अनेक ग्राहकांनी आपलं अकाऊंट री-स्टोअर केले आहेत.