नवी दिल्ली : ई-कॉमर्स सेगमेंटमध्ये भारतातली सर्वात मोठी ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टची लवकरच विक्री होणार आहे. या कंपनीशी स्पर्धा करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या ही कंपनी विकत घेण्याची इच्छाही व्यक्त केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिंट' या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी अमेरिकन कंपनी अमेझॉननं उत्सुकता व्यक्त केलीय. अमेझॉन लवकरच यासाठी ऑफर देऊ शकते. दुसरीकडे जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्टही या घोडदौडीत सहभागी झालीय.


फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी जिथं अमेझॉन ऑफर देण्यासाठी उत्सुक दिसतेय तिथं वॉलमार्ट कंपनीतील मोठा भाग विकत घेण्यासाठी उत्सुक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीतला ४० टक्के भाग विकात घेण्यासाठी वॉलमार्ट चर्चा करत आहे. वॉलमार्टला प्रायमरी आणि सेकंडरी शेअर खरेदी करत फ्लिपकार्टमध्ये मोठी भागीदारी हवीय. 


मिळालेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टचं सध्याचं एकूण मूल्य २१ अरब डॉलरच्या आसपास आहे. वॉलमार्टसोबत डील झाल्यानंतर फ्लिपकार्टचा आवाका आणखीनच मोठा होणार आहे. भारतीय ई-कॉमर्स बाजारात अमेझॉनची टक्कर नेहमीच फ्लिपकार्टशी होताना पाहिलं गेलंय.