मुंबई : सातत्याने वाढत असलेल्या स्पर्धांमध्ये अॅमेझॉन इंडिया (Amazon India)ने युजर्ससाठी जबरदस्त ऑफर सादर केली आहे. याच्याअंतर्गत अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime)ने नविन मासिक अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन इंडियन मार्केटमध्ये सादर केली आहे. नव्या स्कीममध्ये आता नॉन-प्राईम सब्सक्रायबर अॅमेझॉन प्राईमच्या सर्व्हिसअंतर्गत १२९ रुपयांमध्ये महिन्याभराचे सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. याचे वर्षभराचे सब्सक्रिप्शन ९९९ रुपयांमध्ये मिळेल.


आता मिळेल महिन्याभराची मेंबरशिप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी कंपनीकडून फक्त वर्षभराचे सब्सक्रिप्शन मिळत होते. पण आता युजर्स महिन्याभराचे सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. याबद्दल कंपनीने सांगितले की, आमच्याकडून युजर्संना दर महिन्याला मेंबरशिपची रिन्यू डेटने तीन वर्षापूर्वीची माहिती मिळेल. यात जर युजर्सने पुढच्या महिन्यासाठी मेंबरशिप सुरू ठेऊ शकतात किंवा कन्सलही करु शकतात. जर तुम्ही वर्षभरासाठी मेंबरशिप घेऊ इच्छित असाल तर नेट बॅंकींग किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करु शकता. 


सुरुवातीला इतकी होती किंमत


अॅमेझॉनकडून प्रत्येक महिन्यात ऑफरमध्ये युजर्संना प्राईम व्हिडिओ आणि अॅमेझॉन म्युझिकसाठी फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. अॅमेझॉन प्राईम सर्व्हिसची सुरुवात देशात जुलै २०१६ पासून झाली. सुरुवातीला याची किंमत ४९९ रुपये होती. ही सर्व्हीस घेणाऱ्या युजरला वार्षिक प्लॅनचा लाभ मिळत होता. लॉन्चिंगनंतर याची किंमत ९९९ रुपये झाली.


अमेरिकेत याची किंमत 'इतकी'


अमेरिकेतील याची वर्षभराची सर्व्हीस युजर्संना ११९ डॉलर म्हणजे सुमारे ८ हजार रुपयांना मिळते. २०१७ मध्ये अॅमेझॉनने प्राईम डे ला सुरुवात केली. यात युजर्संना एक्सक्लुसिव्ह डिस्काऊंट आणि कॅशबॅकचा फायदा मिळेल. यात युजर्सला वन डे डिलिव्हरी, त्यात सूट असे अनेक फायदे दिले जात होते.