मुंबई : कम्प्युटर अॅक्सेसरीज कंपनी एमब्राननं नवा स्मार्टबॅण्ड लॉन्च केला आहे. या स्मार्टबॅण्डची किंमत फक्त१ हजार ७९९ रुपये आहे.  एमब्राननं एएफबी-११ फ्लेक्सी फिट लाँच केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मार्ट बँण्डचा खरा वापर हेल्थ कॉन्शस लोकांना होतो. दिवसभरात आपण किती कॅलरीज वापरल्या याचा हिशेब हा बॅण्ड ठेवता, कॅलरीज बर्न होणे हे आपल्या शारीरीक हालचालींवर अवलंबून असतं.


‘पॉवर बँक आणि ऑडिओ क्षेत्रात आम्ही स्वत:ला सिद्ध केल्यानंतर आता आम्ही वेयरेवल जगतात पाऊल टाकलं आहे. फिटनेस चाहत्यांना लक्षात घेऊन आम्ही हा बॅण्ड लाँच केला आहे. 


हे फिटनेस ट्रॅकिंग डिव्हाइस स्टायलिश कॉम्बिनेशनमध्ये तयार करण्यात आले आहे', असं एमब्रानचे संचालक गौरव दुरेजा यांनी सांगितलं.


हा बॅण्ड वॉटर रेसिस्टेंट आणि डस्ट प्रूफ आहे. या स्मार्टबॅण्डमध्ये 60 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फ्लेक्सी फिटला आयओएस किंवा अँड्रॉईड स्मार्टफोनशी जोडता येणार आहे.