अरे देवा हे काय केलंस! Scorpio-N चा लूक आनंद महिंद्र आश्चर्यचकीत, ट्वीट करत म्हणाले...
Mahindra Scorpio N Matt Black: महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra And Mahindra) कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटरवर कायमच आपल्या भावना व्यक्त करत असतात. काही व्हिडीओ शेअर करत आश्चर्यदेखील व्यक्त करतात.
Mahindra Scorpio N Matt Black: महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra And Mahindra) कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटरवर कायमच आपल्या भावना व्यक्त करत असतात. काही व्हिडीओ शेअर करत आश्चर्यदेखील व्यक्त करतात. तसेच काही जणांना वैयक्तिक मदत देखील करतात. त्यामुळे आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली की, वेगाने व्हायरल होते. अनेक युजर्स या पोस्टखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवतात. आता आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचं एक ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आहे. महिंद्रा कंपनीने स्कॉर्पिओ एन एसयूव्ही (Scorpio N SUV) नुकतीच लाँच केली आहे. या गाडीची ग्राहकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. गाडीसाठी ग्राहकांना काही महिन्यांचा वेटिंग पिरियडदेखील आहे. पण काही ग्राहकांना स्कॉर्पिओ एन एसयूव्ही मिळाली आहे. आनंद महिंद्रा स्वत: लाल रंगाची स्कॉर्पिओ-एन गाडी वापरतात. या गाडीला त्यांनी 'लाल भीम' असं नाव दिलं आहे. पण एका व्यक्तीनं गाडीचं केलेलं मॉडिफिकेशन पाहून आनंद महिंद्रा यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. गाडीचा वेगळाच लूक पाहून आनंद महिंद्रा देखील फॅन झाले आहेत. त्यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.
"मी फक्त इतकंच सांगू शकतो, वाह! मला आपली #ScorpioN लाल भीम पसंत आहे पण मला हे मान्य करावेच लागेल की ही गाडी जबरदस्त आहे. ही नेपोली ब्लॅक, सॅटिन मॅट फिनिश केल्यानं अरुण पवार आणि दिल्लीतील रॅपाहोलिक्सचं अभिनंदन .", असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. प्रसिद्ध युट्यूबर अरुण पवार याने हा व्हिडीओ अपलोड केला आहे. गाडीचं मॉडिफिकेशन करण्यासाठी 65 हजार रुपयांचा खर्च आला. गाडी युनिक दिसावी म्हणून पेंट प्रोटेक्शन फिल्म लावली आहे. गाडीला मॅट ब्लॅक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Indian Army: भारतीय सैन्यदलात काम करण्याची सुवर्णसंधी, महिना 177500 रुपयांपर्यंत मिळणार पगार
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं स्कॉर्पिओ एन जून महिन्यात लाँच केली होती. या गाडीची सुरुवातीची किंमत 11.99 लाख (एक्स शोरूम) इतकी आहे. टॉप व्हेरियंटची किंमत 19.49 लाख रुपये इतकी आहे.