मुंबई : 'महिंद्रा अॅंड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. सोशल मीडियावर विविध पोस्ट टाकत ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतात. कधी तरूणांनी देसी जूगाड लावत बनवलेल्या कारचे फोटो,व्हिडीओ टाकतात, तर कधी होतकरू तरूणांच्या कामाचा कौतूक करत त्यांना मदतीचा हात देत असतात. मात्र यावेळेस त्यांनी स्वत:च्याच कंपनीच्या महिंद्रा कारचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत हातगाडीवरून ढकलत महिंद्राची कार नेली जात असल्याचे दिसते. ही त्यांची पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. ही पोस्ट टाकण्यामागचे कारण आता त्यांनी सांगितले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी 5 मे ला एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये, एक व्यक्ती हातगाडीवरून महिंद्राची जुनाट टायर नसलेली कार ढकलत नेत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या एका मित्राने त्यांना ही पोस्ट पाठवली होती. त्यानंतर आनंद महिंद्रांनी ही पोस्ट स्वत:च्या अकाऊंटवर केली आहे.  


या पोस्टबाबत सांगताना आनंद महिंद्रा म्हणालेत, माझ्या मित्राने फोटोला खूप चांगली कॅप्शन दिली आहे. महिंद्रा कुठल्याही परिस्थितीत पुढे चालली आहे.  हे मला खूप आवडले आहे. खरंय, आपण पुढे चाललोय. कारण जिथे इच्छा असेल तिथे मार्ग आहे, असे या कॅप्शनमध्ये म्हटलेय. 


या ट्विटरला तूफान प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांनी हे ट्विट लाईक केले असून शेकडोहून अधिक लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे.