हॅंग होणाऱ्या स्मार्टफोनला करा हा उपाय; फोन होईल नवा
...तुम्ही कितीही दावा केलात तरी तुमचा स्मार्टफोन हा नक्कीच हॅंग होत असणार, हे नक्की. म्हणूनच स्मार्टफोनच्या समस्येतून तूमची काहीशी सुटका करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगत आहोत. घ्या जाणून…
मुंबई : ...तुम्ही कितीही दावा केलात तरी तुमचा स्मार्टफोन हा नक्कीच हॅंग होत असणार, हे नक्की. म्हणूनच स्मार्टफोनच्या समस्येतून तूमची काहीशी सुटका करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगत आहोत. घ्या जाणून…
अन्न, वस्त्र, निवारा या जशा मानवाच्या आवश्यक गोष्टी आहेत. तसेच, स्मार्टफोनही हीसुद्धा मानवाची गरज बनली आहे. ही गरज मानवाच्या बदलत्या आणि हायटेक जीवनशैलीचा पुरावा आहे. त्यामुळेच आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन पहायला मिळतो आहे. स्मार्टफोनचे वैशिष्ट्य असे की, सुरूवातीच्या काही काळात ऑपरेटींग करताना अगदी सुस्साट असलेले हे स्मार्टफोन काही दिवसांतच मंद चालू लागतात. पुढे पुढे तर ऑपरेट करातना ते इतके मंद होतात की, हॅंगच होऊन जातात. त्यामुळे हॅंग न होणाऱ्या स्मार्टफोनचा शोध अद्याप तरी लागला नाही.
स्मार्टफोन सतत हॅंग होण्यापसून सुटका मिळवायची असल्यास तुम्हाला तुमच्या फोनची फॅक्ट्री रिसेट करावी लागेल. पण, ही फॅक्टी रिसेट करणे बोलण्याईतके सोपे नाही. ते वरवर पाहता सोपे वाटते इतकेच. फॅक्ट्री रिसेटची एक खास अशी पद्धत आहे. त्या पद्धतीने तुम्ही जर फॅक्ट्री रिसेट केली तर, तुमचा फोन अगदी वेगवान व्हायला मदत होते. पण लक्षात ठेवा जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॅक्टी रिसेट केले तर, तुमच्या फोनमधील महत्वाचा डेटा गायब किंवा डिलीट होऊ शकतो. म्हणूनच समजून घ्या की, योग्य पद्धतीने फॅक्ट्री रिसेट कसे करायचे.
१ – फोन फॅक्ट्री सिसेट करण्याचा पहिला नियम – आपल्या फोनमधील महत्वाचा डेटा जसेकी, फोन नंबर, फोटो, व्हिडिओ, महत्वाची अॅप, मेसेज आंदींचा बॅकप घेऊन ठेवा. कारण फोन फॅक्ट्री रिसेट केल्यावर अगदी नव्या फोनसारका होऊन जातो. त्यात कोणत्याही प्रकारचा डेटा राहात नाही. तसेच, कोणत्याही प्रकारे डिलिट झालेला डेटा परत घेता येत नाही.
२ – बॅकअप घेतल्यावर फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. सेटिग्जमध्ये चेक केल्यावर आपल्याला ‘बॅकअप ऍण्ड रीसेट’ हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर जा.
३ – ‘बॅकअप ऍण्ड रिसेट’ ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपल्याला एक्स्टर्नल एसडी कार्ड एसडी कार्डला हटवायचे की नाही. ते ठरवा. त्यानुसार ऑप्शनवर क्लिक करा.
४ – तुम्ही जर एकदा का तुम्हाला आवश्यक असणारा डेटा घेतला की मग, ‘फॅक्ट्री डेटा रीसेट’ हा ऑप्शन निवडण्यास हरकत नाही. हा ऑप्शन निवडल्यावर आपण रिसेट या ऑप्शनवर क्लिक करा तेथे कन्फर्म हा ऑप्शन आल्यास त्यावक क्लिक करा. बस तुमचा फोन नव्या फोनसारखा चालेल.
५ – फोन रिसेट केल्यावर स्विच ऑफ होऊ शकतो. स्विच ऑफ झालेला फोन काही वेळाने स्विच ऑन करा. प्रोसेस सुरू असतना फोनला कोणतीही आज्ञा (कमांड) देऊ नका.