अँड्रॉइड ‘ओ’ या आवृत्तीला नेमक्या कोणत्या नावाने ओळखले जाणार यासंबधी युजर्सच्या मनात उत्सुकता होती. अँड्रॉइड ‘ओ’ युजर्सससाठी एक आनंदाची बातमी आहे.  काल मध्यरात्री  अँड्रॉइड ‘ओ’चे  नामकरण करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याला ओरिओ हे नाव मिळाल्याचे मध्यरात्री अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
अॅंड्रॉइड ओ आवृत्तीचे सर्व फिचर्स सादर करण्यात झाले होते. याला युजर्सची पसंतीही मिळत होती. असले तरी याचे नाव मात्र अद्याप जाहीर करण्यात आले नसल्यामुळे याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली होती.


सूर्यग्रहणाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी ही प्रणाली अधिकृतपणे जगासमोर सादर करण्यात आली. अखेर याला ओरिओ हे नावाची ओळख मिळाली. अँड्रॉइड ‘ओ’म्हणजेच आताचे ओरिओ चा वापर अँड्रॉइड युजर्स गेल्या ८ महिन्यांपासून करत आहेत. कारण २०१७च्या प्रारंभी अँड्रॉइड ओ या आवृत्तीचा पहिला प्रिव्ह्यू जगासमोर सादर करण्यात आला होता.


गुगल पिक्सल फोन, गुगल पिक्सल एक्सएल, गुगल पिक्सल सी, गुगल नेक्सस ६ पी, गुगल नेक्सस ५ एक्स आणि नेक्सस प्लेअर या मॉडेल्समध्येच ही प्रणाली वापरता येत होती. यानंतर याचे विविध प्रिव्ह्यू लाँच करण्यात आले. 


ओरिओ हा चॉकलेट सँडविच कुकीज म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे जगभरात ओरिओची कुकीज अशीच ओळख होती. आता यापुढे अॅंड्रॉइड ओ या आवृत्तीला याचे नाव मिळाल्याने 'ओरिओ' शब्दाला नवी ओळख मिळाली आहे.