मुंबई :  अँड्रॉइड फोन हे असं साधन बनलं आहे की, आता क्वचितच असा कोणी असेल, ज्याच्याकडे तो नाही. अगदी लहान मुलांपासून के वृद्धांपर्यंत सर्वांकडेच स्मार्टफोन असल्याचे आपण पाहिले असेल. लोकांना स्मार्टफोनची इतकी सवय झाली आहे की, ते आपल्या सगळीच काम त्याच्यावर करु लागली आहे. एवढंच काय तर लहान मुलं देखील आता स्मार्टफोन शिवाय राहू शकत नाही. आपल्या हाताती फोन बाबात जवळ-जवळ सर्वांनाच माहिती असेल, जसे की त्याचे फीचर्स आणि ऍप. परंतु तुम्हाला माहितीय का आपल्यापैकी असे ही काही लोक आहेत, ज्यांना आपला फोन वापरण्याची योग्य पद्धत माहित नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो हे खरं आहे. वर्षानुवर्षे फोन वापरल्यानंतरही बऱ्याच लोकांना त्यांच्या फोनमधील बऱ्याच गोष्टी माहित नसतात किंवा त्याचे शॉट कट्स माहीत नसतात.


परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच काही फीचर्सबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला फोन आणि त्यातील फीचर्स वापरण्याची योग्य पद्धत लक्षात येईल.


मेनू:


फोनमध्ये तीन डॉट असलेलं एक चिन्ह दिसते. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला तुमच्या फोनमध्ये तीन ओळींचा आयकॉन दिसेल, तेव्हा त्यावर टॅप करून तुम्ही मेनूवर जाऊ शकता.


माइक:


तुमच्या Android फोनवर, तुम्हाला मायक्रोफोन आयकॉन मिळेल, ज्यावर तुम्ही तुमच्या फोनवर अनेक गोष्टी करण्यासाठी टॅप करू शकता, होय यामुशे व्हिडीओ किंवा फोटो, तसेच एखादी गोष्ट शोधू शकता, हवामान जाणून घेऊ शकता किंवा अॅप उघडण्यासाठी देखील त्याचा वापर करु शकता.


मोबिला डेटा:


मोबाईल डेटा हा फोनमधील एक महत्वाचा आयकॉन आहे, जो बहुतेक लोकांना माहित असेल. याच्या मदतीने जेव्हा जेव्हा तुमच्या फोनमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडरचे नेटवर्क असेल, तेव्हा तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकाल.


शेअर:


अँड्रॉइड फोनवर एक शेअर आयकॉन आहे, जो कनेक्ट केलेले तीन ठिपके असल्यासारखे दिसते. या शेअरच्या आयकॉनवर टॅप करून तुम्ही फोटो, व्हिडीओ आणि वेबसाइट कोणाशीही शेअर करू शकता


कॅमेरा:


फोनमध्ये उपस्थित असलेला कॅमेरा आयकॉन कॅमेरासारखा दिसतो. तुमच्या फोनचा कॅमेरा उघडण्यासाठी टॅप करा, जे तुम्हाला फोटो क्लिक करू देते तसेच व्हिडिओ शूट करण्यात मदत करते.


WiFi:


आपल्यापैकी बहुतेकांना WiFi चिन्ह माहित असेल. ते कनेक्ट करून, तुम्ही तुमचे घर, कार्यालय आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वायरलेस अंतर्गत इंटरनेट ऍक्सेस करू शकता.