नवी दिल्ली : जर तुमच्याकडे मारुती कंपनीची कार आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमची मारुती कार जर खराब, नादुरुस्त झाली तर तुम्हाला कारचे संपूर्ण पैसे परत कंपनीकडून मिळणार आहेत. पाहूयात नेमका काय आहे हा प्रकार.


तुमची मारुती कार नादुरुस्त झाली आणि कंपनीला ती पुन्हा दुरुस्त करता आली नाही तर कंपनीकडून तुम्हाला कारचे संपूर्ण पैसे परत मिळणार आहेत.


निर्णय ग्राहकाच्या बाजुने


काही दिवसांपूर्वी एक प्रकार समोर आला होता. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीला आपल्या एका कारमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करता आला नाही. हा प्रकार कंझ्युमर कमिशनपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्याचा निर्णय ग्राहकाच्या बाजुने लावण्यात आला आणि मारुती कंपनीला त्या ग्राहकाला कारचे संपूर्ण पैसे परत द्यावे असा आदेश देण्यात आला.


काय आहे संपूर्ण प्रकार


आंध्रप्रदेशातील डॉक्टर केएस किशोर यांनी 10 जानेवारी 2003 साली मारुती सुजुकी अल्टो LX800 ही कार खरेदी केली होती. ही कार किशोर यांनी 3.3 लाख रुपयांत खरेदी केली होती. त्यांच्या मते, कार चालवताना दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या गेअरमध्ये जर्क आणि आवाज येत होता. त्यानंतर त्यांनी याची तक्रार डीलर आणि कंपनी दोघांकडे केली. मात्र, कंपनीकडून या समस्येचं समाधान झालं नाही.



किंमत परत देण्याचे आदेश


डिलरकडे अनेकवेळा गेल्यानंतरही कारमध्ये असलेला बिघाड दुरुस्त झाला नाही असं किशोर यांनी सांगितलं. त्यानंतर किशोर यांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आयोगाने मारुती सुजुकी इंडिया लिमिटेड कंपनीला कारची संपूर्ण किंमत परत देण्याचे आदेश दिले.


ग्राहकाला मिळतील पैसे


ग्राहक आयोगाने सांगितले की, जर कुठल्याही गाडीत बिघाड आला आणि कंपनीला तो दुरुस्त करता आला नाही तर, कंपनीला गाडीची संपूर्ण किंमत पुन्हा ग्राहकाला द्यावी लागेल.