फेसबुक, व्हॉट्सअॅपवरून खाजगी मेसेज चोरते `हे` अॅप!
फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया अॅपवरून एक अॅप खाजगी मेसेज चोरत असल्याचे उघडकीस आले आहे.
नवी दिल्ली : फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया अॅपवरून एक अॅप खाजगी मेसेज चोरत असल्याचे उघडकीस आले आहे. हे अॅप मोबाईल फोनमधील कॉल रेकॉर्डशी संबंधित सुचना चोरत असल्याचे समोर आले आहे. याची कोणालाही माहीती नव्हती. मात्र गुगल हे अॅप पकडण्यात यशस्वी झाले आहे. या अॅपचे नाव 'Tizi'असून गुगलने एका पोस्टद्वारे हा खुलासा केला आहे.
स्पाइवेयर इंस्टॉल करून चोरी
'Tizi' हे अॅप स्पाइवेयर इंस्टॉल करून डेटा चोरीचे काम करत होते. गूगल प्ले प्रोटेक्ट सिक्युरिटी टीमने सप्टेंबर २०१७ मध्ये डिव्हाईस स्कॅन करताना हे अॅप ट्रॅक केले. त्यानंतर गूगल प्ले स्टोरवरून ते हटवण्यात आले. गुगलने या अॅपची माहिती सर्व डिव्हाईसला पाठवली आहे. 'Tizi' अॅपची अपडेट होण्याची क्षमता नव्हती. मात्र अपडेशन नंतर फोन आणि सोशल मीडियावरून सीक्रेट माहिती चोरण्यास सुरूवात केली.
अॅप्समुळे डेटा किंवा इतर माहिती हॅक
काही अॅनरॉईड आणि आयओएस अॅप्स चीनच्या सॉफ्टवेयर इंजिनीअरर्सने तयार केले आहे. या अॅप्समुळे डेटा किंवा इतर माहिती हॅक केली जाऊ शकते. काही दिवसांपुर्वी ही बाब समोर आली. त्यानंतर भारत सरकारने ४० हून अधिक अॅप्स मोबाईलमधून ताबडतोब हटवण्यास सांगितले.