मुंबई :  स्मार्टफोनच्या जगात ऍपल कंपनीने आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे. आधुनिक जगात स्मार्टफोनचे तंत्रज्ञानही आधुनिक ठेवण्याकडे कंपनीचा कल कायम असतो. कंपनीचा नवीन आयफोन 14 लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. परंतू हा आयफोन बाजारात येण्याआधी वेगवेगळ्या रिपोर्ट आणि प्लॅटफॉर्मवरून स्मार्टफोनबद्दल माहिती लोकांसमोर येत आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेल्या फीचर्समुळे वापरकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयफोन 14 मध्ये   USB-C चार्जिंग पोर्ट मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमध्ये USB-C चार्जिंग पोर्ट फक्त ऍंड्राइड स्मार्टफोनमध्ये वापरले जातात. आय़फोन व्यतिरिक्त सर्व फोनमध्ये युएसबी टाइप सी पोर्टचा सपोर्ट मिळतो. आयफोन 14 मध्येदेखील युएसबी टाइप सी आल्याने वापरकर्त्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे.


काही मीडिया रिपोर्टनुसार, ऍपल लाइटनिंग आणि यूसबी 2..0 डेटा ट्रान्सफरच्या जागी कंपनी काही वर्षात पोर्टलेस आय़फोन सुद्धा बाजारात आणू शकते. 


आयफोन 14 मध्ये 48 मेगापिक्सल वाइड-ऍंगल कॅमेरा मिळू शकतो. सुपर पिक्सल आणि लो लाइट फोटोग्राफीमध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान येण्याची शक्यता आहे.


आयफोन 14 मध्ये अनेक विशेष फीचर्स आहेत. फास्ट 5 जी सपोर्टसह अनेक विशेष फीचर्ससुद्धा असणार आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानानुसार 10 गिगाबिटपेक्षा अधिक गती उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचे म्हटले जाते.


अनेक दिवसांपासून आयफोन 14 बाबत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर येत असलेल्या माहितीमुळे युजर्सची या स्मार्टफोनबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.