सॅन फ्रान्सिस्को : जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने कथित स्वरुपात आपल्या एका इंजिनिअरला निलंबित केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या इंजिनिअरच्या मुलीने iPhone X च्या माध्यमातून व्हिडिओ बनवल्याने त्याला निलंबित करण्यात आलं आहे.


इंजिनिअरला निलंबित करण्यामागचं कारण म्हणजे  त्याच्या मुलीने iPhone X ने बनवलेला व्हिडिओ. हा फोन कंपनीने अद्याप बाजारात लॉन्च केलेला नाहीये. या मुलीने तयार केलेला व्हिडिओ युट्युबवर व्हायरल झाला आहे.


या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत एमीलिया पीटरसन अॅपल कंपनीच्या परिसरात आपल्या प्रवासाचा व्हिडिओ शूट करत होती. त्याच ठिकाणी तिचे वडील काम करतात. ते नव्या आयफोन एक्सला आपल्या हातात घेऊन उभे असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.


'द वर्ज' ने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हिडिओत आयफोन एक्स दिसत आहे. इतकेच नाही तर, फोनमधील अॅप्सही दिसत आहेत.


पीटरसनने दावा केला आहे की, तिने तयार केलेल्या व्हिडिओमुळे वडिलांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. व्हिडिओ बनवल्यामुळे अॅपल कंपनीच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे आणि नियमांप्रमाणे अॅपल कंपनीच्या परिसरात व्हिडिओ शूट करण्यास बंदी आहे.


अॅपलने कथित स्वरुपात पीटरसनला व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती केली होती मात्र, त्यापूर्वीच व्हिडिओ व्हायरल झाला.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजिनिअरने आपल्या मुलीला अॅपल एक्स फोन देण्याची पूर्ण जबाबदारी घेतली आणि त्यानंतर कंपनीने कारवाई केली. अॅपलने केलेली ही कारवाई म्हणजे इतरांसाठी एक संदेश आहे की, कंपनीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.