मुंबई : काही महिन्यांपूर्वी फेसबुकसह सर्वच सोशल मीडिया साईट्सवर Sarahah नावाच्या अॅपने धुमाकूळ घातला होता. हे अॅप प्ले स्टोरवर येताच लाखो लोकांनी ते डाऊनलोड केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सराह एक मेसेंजिंग अॅप होते ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची ओळख लपवून कोणतेही मेसेजेस करु शकता. एका रात्रीत हे अॅप सोशल मीडियावर पॉप्युलर झाले होते. मात्र आता गुगल आणि अॅपलने सराह अॅपविरोधात कडक पाऊल उचलताना आपल्या प्ले स्टोरमधून काढून टाकलेय. याचाच अर्थ आता गुगल आणि अॅपल युजर्स हे अॅप डाऊनलोड करु शकत नाही.


गुगल आणि अॅपलने हे पाऊल ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महिलेच्या याचिकेनंतर घेतलेय. या महिलेचे नाव कॅथरीन कॉलिंस आहे. कॅथरीन यांच्या १३ वषाच्या मुलीला या अॅपमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला. 


या कारणामुळे बंद झाले अॅप


या अॅपच्या माध्यमातून कॅथरीन यांच्या मुलीला अनेकदा अपशब्द वापरण्यात आलेय. आपल्या मुलीला येत असलेले मेसेजेस पाहिल्यानंतर कॅथरीने यांनी चेंज.ओआरजीवर सराह अॅपविरोधात याचिका दाखल केली. या अॅपवर बंदी घालण्याची मागणी कॅथरीन यांनी या याचिकेत केली होती. कॅथरीनच्या समर्थनार्थ या याचिकेला तब्बल 4,70,000 लोकांनी पाठिंबा दर्शवला. 


याचिकेला मिळालेला पाठिंबा पाहता गुगल आणि अॅपलने हे अॅप प्ले स्टोरवरुन हटवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी सराह हे अॅप लाँच करण्यात आले होते. सराह एक अरब शब्द आहे ज्याचा अर्थ इमानदार. हे अॅप लाँच केल्यानंतर खूप लोकप्रिय झाले होते. साधारण ३०० मिलियन लोकांनी या अॅपवर अकाऊंट बनवले होते.