मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Apple दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फ्लॅगशिप स्मार्टफोनचे नवीन मॉडेल लाँच करणार आहे. यामध्ये हा स्मार्टफोन प्रत्येकाला विकत घेता येईल यासाठी एक्सचेंज ऑफऱही देतेय. या ऑफरमुळे Apple चा iPhone 12 हा स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. नेमक्या ऑफर्स काय आहेत त्या जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लिपकार्टवर सुट 
Apple ने iPhone 12 चे 128GB स्टोरेज मॉडेल 70,900 रुपये किमतींना बाजारात लॉन्च केले होते. या स्मार्टफोनवर Flipkart ने 12% सवलत दिली आहे, त्यानुसार हा फोन 61,999 रूपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच या फोन खरेदीवर अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून 3,100 रुपये वाचवता येणार आहेत, त्यामुळे या फोनची किंमत 58,899 रुपये होईल. 


एक्सचेंज ऑफर
iPhone 12 च्या या डीलमध्ये एक्सचेंज ऑफर देखील आहे. iPhone 12 अधिक स्वस्तात विकत घेण्यासाठी तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन द्यावा लागेल, ज्याच्या बदल्यात तुम्हाला 11 हजार रुपयांची सूट मिळेल आणि iPhone 12 ची किंमत फक्त 47,899 रुपये होईल. विशेष म्हणजे फ्लिपकार्टची 12 टक्के सवलत आणि बँक क्रेडिट कार्ड ऑफर नंतर इतक्या कमी किंमतीत हा स्मार्टफोन विकत घेता येणार आहे. 


 फिचर्स 
 iPhone 12 5G फोन आहे. 
 iPhone 12 मध्ये 128GB स्टोरेज वेरिएंट
A14 Bionic चीप
6.1-इंचाच्या सुपर रेटिना XDR डिस्प्ले
 फ्रंट कॅमेरा 12MP मागील कॅमेरा सेटअपमध्ये दिलेले दोन्ही सेन्सर 12MP 
 ड्युअल सिम तर फोनवर एका वर्षाची ब्रँड वॉरंटी